PPE suit for the prevention of germs and the safety of doctors | जंतूचा संसर्ग टाळण्यासाठी अन् डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीपीई सूट

जंतूचा संसर्ग टाळण्यासाठी अन् डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीपीई सूट

ठळक मुद्देकोरोना संशयित रुग्णांचे स्वॅप (नमुने) घेणे गरजेचे असतेस्वॅप घेताना डॉक्टरांना संसर्ग होण्याची भीती असतेजंतूचा संसर्ग  होऊ नये यासाठी स्पेशल सूट डिझाईन करण्यात आलेला असतो

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅप (नमुने) घेणे गरजेचे असते. स्वॅप घेताना डॉक्टरांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यांना या जंतूचा संसर्ग  होऊ नये यासाठी स्पेशल सूट डिझाईन करण्यात आलेला असतो. त्याला पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट सूट) असे म्हणतात. सध्या जिल्हा प्रशासनाकडे असे १० सूट उपलब्ध असून, आणखी सूटची मागणी करण्यात आली आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडे १० पीपीई सूट उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र व रेल्वे रुग्णालयात असे सूट वापरण्यात येत आहेत. एकदा हा सूट परिधान केल्यानंतर तीन तासांपर्यंत वापरता येतो. त्यानंतर त्याचा वापर करता येत नाही.  सध्या असे ड्रेस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. दक्षता म्हणून आणखी सूट मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. 

कोरोना आजार संशियतांवर उपचार करण्यासाठी पुरेशी औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात व्हेंटिलेटर, आॅक्सिजन, इंजेक्शन आणि इतर साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोरोना  आजार संबंधित अफवा पसरविण्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्याशी जिल्हा प्रशासन संपर्कात आहे. अफवा पसरविणाºयांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार आहेत. सध्या पंढरपूर  येथे अफवा पसरविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विषाणूशी संपर्क टाळण्यासाठी वापर
- पर्सनल प्रोटेक्टिव्ह सूट एक प्रकारचे स्पेशल इक्विपमेंट असते. त्याला परिधान केल्यामुळे जंतूचा संसर्ग टाळता येतो. रुग्णाला डॉक्टरने स्पर्श केल्यानंतर किंवा नकळतपणे सूटशी संपर्क जरी आला तरी विषाणू पसरण्यास मज्जाव करता येतो. साधारणपणे संसर्गजन्य रुग्णांवर उपचार करताना किंवा अशा रुग्णाचे रक्त, स्वॅप (नमुने) घेताना डॉक्टर हा सूट वापरतात. सध्या कोरोना आजार पसरत असल्याने आयसोलेशन व कोरोना व्हायरस वॉर्डमध्ये अशा प्रकारचे सूट वापरण्यात येत आहेत. या सूटमुळे पायापासून डोळ्यापर्यंत सर्व भाग सुरक्षित राहू शकतो. डोळे, चेहरा आणि हातदेखील झाकले जातात.

Web Title: PPE suit for the prevention of germs and the safety of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.