सोलापूर शहर पोलिसांकडून हातभट्टी दारू जप्त, दोन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 15:59 IST2018-10-13T15:57:43+5:302018-10-13T15:59:30+5:30
सोलापूर : फौजदार चावडी पोलिसांनी ५२ हजार ५०० रूपयांची हातभट्टी दारू जप्त केली. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उमानगरी शरदचंद्र ...

सोलापूर शहर पोलिसांकडून हातभट्टी दारू जप्त, दोन आरोपी अटकेत
सोलापूर : फौजदार चावडी पोलिसांनी ५२ हजार ५०० रूपयांची हातभट्टी दारू जप्त केली. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उमानगरी शरदचंद्र शाळेजवळून ही दारू नेली जात असताना पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे.
सतीश रमेश राठोड (वय-२२ रा. मुळेगांव तांडा, दक्षिण सोलापूर), अजित नवनाथ राठोड (वय-२0 रा. बक्षी हिप्परगा सेवा तांडा, दक्षिण सोलापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ शहरात बेकायदा विक्री करण्यासाठी हातभट्टीची दारू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनावरून उमानगरी परिसरातील शरदचंद्र पवार शाळे जवळ सापळा लावण्यात आला होता.
पहाटे ५ वाजता मारूती सुझुकी (क्र.एम.एच.-१२ ए.एक्स-२४0३) उमानगरीकडून निराळे वस्तीच्या दिशेने जाणाºया वाहनाला संशयावरून थांबवून तपासणी केली असता त्यात १ हजार ५0 लिटरचे १५ ट्युब हातभट्टी दारू आढळुन आली. हात भट्टीचा मालक किसन नामदेव राठोड (रा. मुळेगाव तांडा) असल्याचे समजले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडुन कारसह १ लाख १७ हजार ५00 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालकासह तिघांविरूद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.