गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:31 PM2019-11-04T22:31:30+5:302019-11-04T22:32:27+5:30

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Police say crime helps in the netting of the Prevention of Corruption | गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

googlenewsNext

पंढरपूर : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करतो म्हणून सहा हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसालालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. अटक केलेला पोलीस कर्मचारी चे नाव बापू उत्तम झोळ आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे मध्ये तक्रारदाराच्या मुला विरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुणाच्या तपासामध्ये मदत करतो म्हणून बापू उत्तम झोळ यांनी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून पाच हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्ररदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  अधिकार्‍यांकडे तक्रार केली. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांनी यांनी या सर्व प्रकरणाची पडताळणी केली. त्यामुळे पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू उत्तम झोळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचाच्यासमोर लाचेची मागणी केली. त्यामुळे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यांमध्ये बापू झोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अपरपोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जगदीश भोपळे, सहाफौजदार निलकंठ जाधवर, पोकॉ. सिध्दाराम देशमुख, पोकॉ. प्रफुल्ल जानराव यांनी केली आहे.

Web Title: Police say crime helps in the netting of the Prevention of Corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.