सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 10:54 IST2018-03-12T10:54:02+5:302018-03-12T10:54:02+5:30

सहा ठिकाणी टाकली धाड; ३० लाखांची दारू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Police outlets in illegal liquor shops in Sangola area | सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी

सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी

ठळक मुद्देही कारवाई पो. कॉ. विठ्ठल विभुते, महिपती कांबळे, पो. ना. शिवाजी जाधव, सागर भोसले यांनी केली हातभट्टी जप्त करून सहा जणांवर कारवाई

सांगोला : सांगोला पोलिसांनी कटफळ, चिकमहुद, महुद, मांजरी, कमलापूर, वाटंबरे अशा सहा ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी धाडी टाकल्या. यात ३० लाख रुपये किमतीचा देशी, विदेशी मद्यसाठा व हातभट्टी जप्त करून सहा जणांवर कारवाई केली.

पो. नि. राजकुमार केंद्रे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. कटफळ येथील दीपक खरातच्या हॉटेलमध्ये ४ हजार १५४ रुपये, महुद येथील अमोल धनवडेच्या बिर्याणी हाऊसमध्ये ११ हजार, पांडुरंग कांबळेच्या हॉटेल मामा-भाचेच्या पाठीमागे ठेवलेली २ हजार १०६ रुपयांची दारू, कमलापूर येथील सीताराम ऐवळेच्या राहत्या घराच्या पाठीमागे १५ लिटर हातभट्टीसह मिळून आला.

गोट्या उर्फ रोहित धनवडे हा वाटंबरे येथील बेघरवस्तीमध्ये २ हजार ३८८ रुपयांची देशी दारू विक्री करताना, चिकमहुद येथील खंडू चव्हाण हा  ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीजवळ ५ लिटर हातभट्टी विक्री करत असताना मिळून आला. ही कारवाई पो. कॉ. विठ्ठल विभुते, महिपती कांबळे, पो. ना. शिवाजी जाधव, सागर भोसले यांनी केली आहे.

Web Title: Police outlets in illegal liquor shops in Sangola area