धक्कादायक; वाळुच्या ट्रकचे टायर चोरताना पोलिसांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:44 IST2020-01-08T12:39:26+5:302020-01-08T12:44:12+5:30

सोलापुरात गुन्हा दाखल; अक्कलकोट जुना पोलीस वसाहत येथील प्रकार

Police arrest three for stealing sand truck tires | धक्कादायक; वाळुच्या ट्रकचे टायर चोरताना पोलिसांसह तिघांना अटक

धक्कादायक; वाळुच्या ट्रकचे टायर चोरताना पोलिसांसह तिघांना अटक

ठळक मुद्दे- अक्कलकोट पोलीसांनी चौघांना घेतले ताब्यात- ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अलर्ट- पोलीसानेच केली पोलीस स्टेशन आवारातील ट्रकच्या चाकाची चोरी

सोलापूर : अक्कलकोट शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे लावण्यात आलेल्या वाळुच्या मालट्रकचे चाक चोरून नेताना, पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तिघांना अटक केली असुन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब ब्रह्मदेव शिंदे (नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर), सोमा विठ्ठल गायकवाड (बोळकवठा ता. दक्षिण सोलापूर), गणेश मल्लेश मरेवाले (रा. मळसिद्धनगर मंद्रुप दक्षिण सोलापूर), दयानंद बसवराज यळकर (रा. मळसिद्धनगर मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बेकायदा वाळु वाहतुकीच्या गुन्ह्यात मालट्रक (क्र.एम.एच. १२ ए.यू. ७९३७) जप्त करण्यात आला आहे. हा मालट्रक जुनी पोलीस वसाहत येथील रूम नं. २८ व २९ समोर लावण्यात आली होती. 

मंगळवारी सायंकाळी सायंकाळी ५.३0 वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब शिंदे व अन्य तिघे जुनी पोलीस वसाहतीमध्ये आले. मालट्रकच्या पाठीमागील बाजुचे ४0 हजार रूपये किंमतीचे लोखंडी डिस्कसह दोन चाक घेऊन जात होते. हा प्रकार वसाहतीमधील पोलिसांच्या लक्षात आला. चौघांनी अक्कलकोट पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत. 

 

Web Title: Police arrest three for stealing sand truck tires