विष द्रव्य प्राशन; विवाहितेचा मृत्यू

By Admin | Updated: May 20, 2014 00:57 IST2014-05-20T00:57:51+5:302014-05-20T00:57:51+5:30

सांगोला : अज्ञात कारणावरुन विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन

Poisonous protein; Marriage death | विष द्रव्य प्राशन; विवाहितेचा मृत्यू

विष द्रव्य प्राशन; विवाहितेचा मृत्यू

सांगोला : अज्ञात कारणावरुन विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना हंगिरगे (ता. सांगोला) येथे घडली. सुनीता महादेव साबळे (वय ३०) असे मरण पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. हंगिरगे येथील सुनीता महादेव साबळे या विवाहित महिलेने बुधवारी (१४ मे) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणावरुन विषारी औषध प्राशन केले होते. तिला गंभीर अवस्थेत पती महादेव साबळे यांनी उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शनिवारी (१७ मे) सुनीता साबळे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सांगली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगोला पोलिसात खबर दिली असून, तपास सहायक फौजदार तळवार करीत आहेत.

 

Web Title: Poisonous protein; Marriage death