सोलापूर : बार्शी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. “अनैसर्गिक युती आघाड्या जनता स्वीकारणार नाही. जनता भाजपच्याच बाजूने राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयकुमार गोरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक पक्ष स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असून, त्यासाठीच विविध युती-आघाड्या केल्या जात आहेत. “स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी युती कराव्या लागत आहेत, यावरूनच भाजप किती मजबूत आहे, हे स्पष्ट होते,” असा टोला त्यांनी लगावला.
भारत स्पेस स्टेशन बनवणार! ISRO ने काम सुरू केले; कधीपर्यंत तयार होईल जाणून घ्या
महायुतीतील घटक पक्षांनी काही आचारसंहिता पाळणे गरजेचे असल्याचे सांगत, महायुतीच्या बाहेर जाऊन स्थानिक आघाड्या करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, असा सल्लाही गोरे यांनी दिला. बार्शीत नेमकी कोणती युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटते, हे त्यांनाच विचारा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
“भाजपचा पराभव एक-दोन-तीन जण एकत्र येऊन करता येणार नाही, हे विरोधकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आता पाच-पाच पक्ष एकत्र येत आहेत. मात्र अशा अनैसर्गिक युती जनतेच्या गळ्यात उतरणार नाहीत,” असे ते म्हणाले. आगामी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल, असा दावाही त्यांनी केला.
वाशीम ग्रामसभा प्रकरण
वाशीम ग्रामसभेच्या प्रकरणावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “मला या विषयाची सविस्तर माहिती नाही. मात्र अशा प्रकारचे कृत्य करता येणार नाही. ग्रामसभेचे काही ठराविक नियम असतात. कुठल्या परिस्थितीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले, याची चौकशी करण्यात येईल.”
सोलापूर महापालिका गटनेता व महापौर
सोलापूर महापालिकेतील गटनेता निवडीबाबत त्यांनी सांगितले की, भाजपची बैठक पार पडली असून पक्षाकडे ८७ नगरसेवक आहेत. अनेक सक्षम चेहरे असून, त्यापैकी एकाची निवड गटनेता म्हणून केली जाईल. महापौर निवड ही निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नियम व वेळापत्रकानुसारच होईल. “महापौर हा सोलापूरचा नागरिक आणि भाजपचाच नगरसेवक असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमधील घराणेशाहीवर भूमिका
घराणेशाहीच्या मुद्द्यावर जयकुमार गोरे म्हणाले की, एखाद्या नेत्याचे नातेवाईक जर पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि चांगले काम करत असतील, तर त्यांचाही विचार व्हायला हवा. मात्र थेट उमेदवारी देणे हे भाजपच्या संहितेला धरून होणार नाही. शक्यतो कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष करतो, असे त्यांनी सांगितले.
Web Summary : Jaykumar Gore asserts BJP's strength, dismissing opposition alliances as unnatural and driven by survival. He predicts a BJP victory in the upcoming Solapur Zilla Parishad elections and addressed concerns regarding party conduct and nepotism.
Web Summary : जयकुमार गोरे ने भाजपा की ताकत का दावा किया, विपक्षी गठबंधनों को अस्वाभाविक और अस्तित्व के लिए बताया। उन्होंने आगामी सोलापुर जिला परिषद चुनावों में भाजपा की जीत की भविष्यवाणी की और पार्टी आचरण व भाई-भतीजावाद संबंधी चिंताओं को संबोधित किया।