शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

इकडे लक्ष द्या; सोलापूर जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी २९ व ३० सप्टेंबरला परीक्षा

By appasaheb.patil | Published: September 24, 2022 2:23 PM

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर  : शालेय पोषण आहार योजनेसाठी जिल्हा परिषद, सोलापर अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यासाठी 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा 29 व 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत डायनामिक कॉप्युटर्स, बँक ऑफ इंडिया, सात रस्ता, सोलापूर याठिकाणी घेण्यात येणार आहे.

यापूर्वी रविवार  25 ऑगस्ट 2019 रोजी परिक्षा निश्चित करण्यात आली होती. परंतु तात्रिक / प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. संबंधित उमेदवारांनी परीक्षेस प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे. 

या परीक्षेचे प्रवेश पत्र आपणांस अर्जावर नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअपव्दारा प्राप्त होईल. ज्यांना प्रवेश पत्र प्राप्त होणार नाही अशा उमेदवारांनी 9890292961 या मोबाईल क्रमांकावर व या कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे.

परीक्षेस येताना आधार कार्ड /वाहन परवाना/मतदान ओळखपत्र यापैकी एकाची मूळ व छायांकित प्रत त्यावर आधार नंबर नमुद करुन घेवून यावा, असे सचिव, निवड समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरjobनोकरीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद