शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पेशंट्स पेशन्स ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 15:19 IST

रुग्ण आणि डॉक्टरांतील संवाद दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्याचे पर्यावसान बºयाचदा गैर समजांमध्ये किंवा कधी कधी डॉक्टरांवर हल्ले करण्यात होते आहे

रुग्ण आणि डॉक्टरांतील संवाद दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्याचे पर्यावसान बºयाचदा गैर समजांमध्ये किंवा कधी कधी डॉक्टरांवर हल्ले करण्यात होते आहे. या गोष्टीला फक्तडॉक्टरच जबाबदार आहेत, असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नेहमीच वाटत असते. डॉक्टर किंवा हॉस्पिटलवर हल्ला झाल्यानंतर बºयाच वेळा डॉक्टर संपावर जातात. असे करणे म्हणजे ही डॉक्टरांची चूक आहे, असेही सर्वसामान्य नागरिकांना वाटत असते. परंतु प्रत्यक्ष कारणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सहसा केला जात नाही. असा प्रयत्न व्हावा आणि रुग्ण व डॉक्टरांमधील गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने हा पत्रप्रपंच.़़ अनेकदा हे गैरसमज काही ठाम समजुतीवर अवलंबून असतात. काही गोष्टी रुग्ण आपले हक्क आहेत असे समजतात तर बºयाच वेळा अनेक गोष्टींकडे ते डॉक्टरांचे कर्तव्य म्हणून पाहत असतात.अशा अनेक गैरसमजांचा ऊहापोह पुढील लेखात मी करणार आहे.

आपल्याकडे असलेल्या माहितीवरुन किंवा मीडियातून मिळणाºया माहितीवरुन सर्वसामान्य माणूस डॉक्टरांबद्दल काही ठराविक आडाखे बांधून असतो. ज्यावेळी डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग येईल तेव्हा पूर्वग्रहदूषित नजरेने तो डॉक्टरांकडे पाहत असतो. आणि मग आणीबाणीच्या प्रसंगी या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून गैरसमजापोटी वाद, हॉस्पिटलवर हल्ले, डॉक्टरांना मारहाण असे प्रसंग निर्माण होतात. म्हणून सर्वसाधारणपणे जे गैरसमज डॉक्टरांबद्दल समाजात प्रचलित आहेत, त्यामागची खरी पार्श्वभूमी व माहिती सर्वांना मिळावी, या हेतूने या मुद्यांच्या स्वरुपात हा पत्रप्रपंच.

डॉक्टर म्हणजे देव मुळात हाच एक फार मोठा गैरसमज आहे. कोणताही डॉक्टर हा चमत्कार करुन रुग्ण बरा करु शकत नाही. तो आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करतो. प्रयत्नांची शर्थ करतो. 

सहकाºयांची मदत घेतो. उपलब्ध साधनसामुग्री वापरुन रुग्ण बरा करण्याचा प्रयत्न करतो. रुग्ण बरा झाल्यावर त्याचे श्रेयही घेण्याकडे डॉक्टरांचा कल नसतो आणि म्हणूनच अनेक दवाखान्यांत (क ळफएअळ, ऌए उवफएर असे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही डॉक्टराला स्वत:ला देव म्हटलेले आवडत नाही. कारण एक डॉक्टर म्हणून काम करताना तो किती हतबल असतो, याची त्याला स्वत:ला कल्पना असते.

खासगी रुग्णालये फक्त पैसे कमावण्यासाठी काम करतात?आपल्या देशातल्या ७० टक्के रुग्णांना खासगी रुग्णालये उपचार देत आहेत जे की १०० टक्के सरकारची जबाबदारी आहे. या दिलेल्या उपचाराच्या बदल्यात डॉक्टरांनी किंवा रुग्णालयांनी योग्य मार्गाने पैसे कमावणे हा नक्कीच गुन्हा नाही. खासगी रुग्णालयांतून बरे होणाºया रुग्णांची संख्या पाहिली तर उलट समाजाने या रुग्णालयांचे आभार मानले पाहिजेत. 

खासगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयापेक्षा जास्त उपचार मिळतात असे मुळीच नाही. सर्वसाधारणपणे एखाद्या आजारासाठी रुग्णाला मिळणारे उपचार हे बºयापैकी सर्व रुग्णालयांत सारखेच असतात. कदाचित सोयीसुविधांमध्ये फरक असू शकतो, पण उपचारात फारसा नव्हे. रुग्णांनी आणि नातेवाईकांनी मिळणाºया उपचाराकडे लक्ष द्यायला हवे. सोयीसुविधांकडे नव्हे. खासगी रुग्णालयातील उपचार हे खर्चिक होत चालले आहेत. यात नक्कीच तथ्य आहे, पण अशी कोणती गोष्ट या देशात आहे की, पूर्वीपेक्षा आता स्वस्त झालेली आहे? ज्या जागेत दवाखाना उभारला जातो त्याची प्रचंड किंमत डॉक्टरांनी दिली असती. त्या जागेवर जे बांधकाम केलेले असते त्यासाठी मोठ्या कर्जाचा भार डॉक्टराच्या डोक्यावर बरीच वर्षे असतो.

रुग्णांना दिल्या जाणाºया सोयी-सवलती, स्पेशल रुम, एसी, टीव्ही, गरम पाणी, स्टाफचा पगार यासाठी रुग्णालये प्रचंड खर्च करीत असतात. त्यांना मिळणारी वीज, टेलिफोन सेवा, गॅस सिलिंडर हे सारे बाजारभावानेच विकत घ्यावे लागते. कोणत्याही प्रकारची सवलत सरकार देत नाही. उलट नवनवीन नियमांमुळे आणि स्पर्धेमुळे दिवसेंदिवस रुग्णालये चालवणे हे मुश्कील होत आहे. छोटी रुग्णालये या परिस्थितीत तग धरु शकतील, अशी शक्यता वाटत नाही. तेव्हा येणाºया काळात रुग्णसेवा स्वस्त होण्याची शक्यता दिसत नाही. यासाठी रुग्णांनी आपले विचार बदलले पाहिजेत असे वाटते. स्वत: वा कुटुंबातील व्यक्ती कधी ना कधी आजारी पडणार आहे. अचानक खर्च उद्भवणार आहे. हे गृहित धरुन पुरेसा आरोग्य विमा उतवरणे हा त्यावरचा उपाय असेल. मुलांच्या शिक्षणाची, लग्नाची तरतूद जाशी करतो तशी आजाराचीही करुन ठेवायला हवी. महागड्या खासगी दवाखान्यात उपचार घेण्याचा हट्ट न करता कमी खर्चात उपचार होतील , अशा ठिकाणी किंवा सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास काहीच हरकत नाही.- डॉ. सचिन जम्मा(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल