रुग्णसेवक आनंद गोसकी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:51+5:302020-12-05T04:41:51+5:30

रुग्णसेवेसारखं पवित्र काम जगात दुसरे नाही या उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात गोरगरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य ...

Patient Anand Goski elected as District President | रुग्णसेवक आनंद गोसकी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

रुग्णसेवक आनंद गोसकी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

रुग्णसेवेसारखं पवित्र काम जगात दुसरे नाही या उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात गोरगरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अविरतपणे करत आहे. गोसकी हे रुग्णसेवक असून त्यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकतेच गौरविण्यात आले आहे. जनआधार फाउंडेशनकडून कोरोना संकटात मास्क, सॅनिटायझर आणि दोन वेळचे जेवण घरोघरी वाटप करण्याचे महत्कार्य गोसकी यांनी केले. या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गोसकी यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Patient Anand Goski elected as District President