शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे सोलापुरातील विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:10 IST

मिशन अ‍ॅडमिशन : दहावी परीक्षा पास झालेल्यांसाठी आज वेळापत्रक जाहीर होणार

सोलापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यामुळे आता विद्यार्थी आणि पालक आपल्या यशाचा आनंद बाजूला सारत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी लक्ष देत आहेत. पालक आता मुलांच्या आवडीनुसार संबंधित शाखेसाठी महाविद्यालयाचा शोध घेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर अकरावीसाठी मात्र ५९ हजार ४० जागा आहेत. उत्तीर्ण झालेल्यांपैकी अनेक विद्यार्थी हे आयटीआय, डिप्लोमा या क्षेत्राकडे वळत असतात. आता दहावीचा निकाल लागल्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचे प्रवेशाचे वेळापत्रक कधी जाहीर होईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अकरावीच्या पारंपरिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

सोलापूरच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली असून या वर्षी ९७.५३ टक्के निकाल लागला आहे.  सोलापूर शहरात कला शाखेसाठी ५४४० जागा, विज्ञान शाखेसाठी ५१६० जागा आणि वाणिज्य शाखेसाठी ३७२० जागा आहेत. यंदा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी जास्त असल्यामुळे विज्ञान शाखेच्या मेरिट लिस्टवरही अनेकांचे लक्ष असणार आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रवेश क्षमता        शहर             जिल्हा     एकूणकला शाखा         ५४४०      २३२४०     २८६८०विज्ञान शाखा     ५१६०      १५८००     २०९६०वाणिज्य         ३७२०     ३२४०     ६९६०संयुक्त         ७२०     १७२०     २४४०एकूण         १५०४०     ४४०००     ५९०४०याशिवाय सोलापूर शहरात डिप्लोमाची दहा महविद्यालये आहेत. २६८० जागा आहेत. आयटीआयच्या विविध २५ कोर्सेससाठी ८५६ जागा आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीEducationशिक्षण