शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

चुलत्याचा खून करणाºया पुतण्यास जन्मठेप, पंढरपूर न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:41 PM

सोलापूर : पैशाच्या कारणावरुन चुलता मोतीलाल बाबुलाल मुंढे (वय ७२, रा. अकोला वा. ता. सांगोला) यांचा खून केल्याप्रकरणी पुतण्या जमीर राजवल्ली मुंढे याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी सुनावली.२३ डिसेंबर २०१४ रोजी मोतीलाल हे घरात झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या ...

ठळक मुद्देदंड न भरल्यास  १ वर्षे साध्या कैदेची शिक्षामयताच्या वारसाला २० हजार रुपये देण्याचा आदेश

सोलापूर : पैशाच्या कारणावरुन चुलता मोतीलाल बाबुलाल मुंढे (वय ७२, रा. अकोला वा. ता. सांगोला) यांचा खून केल्याप्रकरणी पुतण्या जमीर राजवल्ली मुंढे याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी सुनावली.

२३ डिसेंबर २०१४ रोजी मोतीलाल हे घरात झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी जमीर हा तिथे आला आणि त्याने पैशाची मागणी केली. मी आता पैसे देणे बंद केले आहे, असे म्हणताच आरोपी जमीर हा संतप्त झाला. त्यानंतर त्याने मोतीलाल यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. मयत मोतीलालची पत्नी शाबिरा हिने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी जमीरवर भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी सपोनि कुंभार यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यातील बाल नेत्रसाक्षीदार साहिल शरीफ  मुंढे, शाबिरा मोतीलाल मुंढे व वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. सरडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.  न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी जमीर मुंढेला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास  १ वर्षे साध्या कैदेची शिक्षाही सुनावली. मयताच्या वारसाला २० हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यात सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद गोरे तर आरोपीतर्फे अ‍ॅड. सुधीर वाघ यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून हवालदार रवींद्र बनकर यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCourtन्यायालय