...अन्यथा सगळ्यांचेच आरक्षण काढून टाका-उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 13:23 IST2019-06-14T13:22:48+5:302019-06-14T13:23:07+5:30
धनगर, लिंंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे रद्द करा.

...अन्यथा सगळ्यांचेच आरक्षण काढून टाका-उदयनराजे
सोलापूरः धनगर, लिंंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे रद्द करा. आरक्षणामुळे जाती-धर्मात भांडणे लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना आरक्षण लागू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सोलापुरात केली. येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. सगळे आरक्षण रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देऊ नका.
लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हीएम तोडा आणि माणसे जोडा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. तुम्ही ईव्हीएमवर झालेल्या मतदानातून निवडून आलात, तरीही त्यावर संशय घेताय, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, माझं ठाम मत आहे की निवडून येणं महत्त्वाचं नाही. मी यापूर्वीचा पराभव पचवला आहे. पण यावेळी माझ्या मताधिक्यात दोन-सव्वा दोन लाखांनी घट झाली. सोलापुरातही ज्यांच्या जाहीर सभांना गर्दी झाली ते पराभूत झाले. ज्यांना कोण ओळखत नाही, असे लोक निवडून आले. सगळीकडे दोन-अडीच लाखांचा फरक आहे. फेरनिवडणूक व्हावी, अशी माझी मागणी आहे.