शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

‘टू प्लस’ गुन्ह्यातील आरोपी बनला सेंद्रिय शेती बागायतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 2:43 PM

गुन्हेगारीतून परिवर्तनाची वाट;  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपक्रमाला यश

ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे़‘टू प्लस’ माध्यमातून गुन्हेगारांना या प्रवाहातून बाहेर काढण्यास मदतया उपक्रमामुळे अनेक गुन्हेगार मूळ प्रवाहात आले आहेत.

नितीन उघडे 

कामती: सलग तीन वर्षे दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकºयाला अक्षरश: मेटाकुटीला आणले़ शेतकºयाची अतिशय दयनीय अवस्था झाली. अशा स्थितीत कुरुल(ता.मोहोळ) येथील प्रमोद लांडे या शेतकºयाने अवैध दारू विक्री चालू केली़ या व्यवसायातून स्वत:चा उदरनिर्वाह चालवला. परंतु पोलिसात गुन्हे दाखल झाले़ मात्र पोलिसांनी गुन्हेगारीच्या अंधार दुनियेतून प्रकाशाची वाट दाखवली़ आज सेंद्रीय शेती फुलवून इतरांसाठी मार्गदर्शक बनलेल्या एका आरोपीची ही कहाणी आहे.

प्रमोद लांडे असे गुन्हेगारी जगतातून स्वत:ला परिवर्तन करवून घेतलेल्या आरोपीचे नाव आहे़ अवैध धंदा करणे म्हणजे एक गुन्हाच़ या गुन्ह्याखाली लांडे यांच्यावर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर अनेक संकटे आली. पोटासाठी हाताला काम मिळत नव्हते, ना शेती करता येत होती़ अनेक प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरत होते. बघता-बघता कामती पोलीस ठाण्यात दोनपेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. वारंवार पोलिसांचे बोलावणे, पकडून घेऊन जाणे अशा घटना अनेकदा घडत होत्या. 

इकडे वडिलोपार्जित ५० एकर जमीन असून त्याकडे दुर्लक्ष झाते. अवैध धंद्यामुळे जीवनाला उतरती कळा लागली. सोलापूर ग्रामीण घटकात अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरातील दोनपेक्षा अधिक गुन्हे केलेल्या आरोपींची यादी तयार करून त्यांचा एक मेळावा घेतला. आरोपींना गुन्हेगारीचा मार्ग सोडून मूळ प्रवाहात आणण्याकरिता पहिले पाऊल पडले़ जर आरोपी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवेल तर त्यांच्याविरुद्ध कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.

 कित्येक आरोपींनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून स्वत:च्या वर्तणुकीत सुधारणा केली़ याच पद्धतीने कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुल (ता.मोहोळ) येथे राहणारे प्रमोद अभिमान लांडे यांचे समुपदेशन करण्यात आले़ गुुन्हेगारी मार्ग सोडून ते आता कुरुल परिसरामध्ये एक प्रगतिशील शेतकरी म्हणून उदयाला आले आहेत.

अधिकाºयांचे मार्गदर्शन, परिवर्तनाच्या जिद्दीने नवजीवन ‘टू प्लस’ या उपक्रमांतर्गत कामती पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण उंदरे, मंदु्रप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांचे मार्गदर्शन आणि त्यातच यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे त्यांनी स्वत:ची शेती करण्याचा निर्णय घेतला. रासायनिक खताचा जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे प्रमोद लांढे यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली़ सेंद्रिय पद्धतीने त्यांनी शेतात द्राक्षे, डाळिंब, ऊस पिकांची लागवड केली. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे साहित्य त्यांनी पुणे येथून खरेदी केले. शेण, मलमूत्र व पाणी हे एकत्रित करून त्यांनी गोबर गॅसची निर्मिती केली. यापासून जो टाकाऊ भाग बाहेर पडतो त्यापासून पाणी तयार केले जाते. या पाण्याचा वापर आता शेतीसाठी केला. पंचक्रोशीतील शेतकºयांना आता ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. 

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे व मंदु्रप पोलीस ठाण्याचे संदीप धांडे यांनी मला गुन्हेगारीतून बाहेर पडून मूळ प्रवाहात येण्यासाठी मदत केली़ आता मी सेंद्रीय पद्धतीने शेती करत आहे. अधीक्षकांच्या ‘टू प्लस’ उपक्रमाचे स्वागत करतो.-प्रमोद लांडेसेंद्रिय शेती बागायतदार कुरुल

वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे़ ‘टू प्लस’ माध्यमातून गुन्हेगारांना या प्रवाहातून बाहेर काढण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे अनेक गुन्हेगार मूळ प्रवाहात आले आहेत. ही संकल्पना राबवल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वी पार पडल्या आहेत.- किरण उंदरे सहायक पोलीस निरीक्षक कामती पोलीस ठाणे

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसagricultureशेतीFarmerशेतकरी