पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करताना मुलीवर अतिप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 04:13 IST2019-09-07T04:13:39+5:302019-09-07T04:13:44+5:30

सांगलीस कोल्हापूरमधील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्याच्या सूचना शाळेने दिल्या होत्या

Oppression on a girl while raising funds for the afflicted | पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करताना मुलीवर अतिप्रसंग

पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करताना मुलीवर अतिप्रसंग

सोलापूर : पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची संतपाजनक घटना जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीला न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

सांगलीस कोल्हापूरमधील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्याच्या सूचना शाळेने दिल्या होत्या. त्यानुसार १५ आणि १० वर्षाच्या दोन अल्पवयीन बहिणी निधी गोळा करीत होत्या. १० वर्षाची लहान बहीण तिच्या मैत्रीणीसोबत जेलरोड पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका कारखान्यामध्ये मदतनिधी मागण्यासाठी गेली़ त्यावेळी आरोपी लक्ष्मण ज्ञानोबा बड्डू (वय ४०, रा़ सोलापूर) दोघींना पायऱ्यावर घेऊन गेला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी मुलीने पेनच्या टोकाने आरोपीला मारत कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून पळ काढला. या घटनेची फिर्याद आईने गुरूवारी रात्री दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Oppression on a girl while raising funds for the afflicted