शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मोहोळ तालुक्यात वंचित आघाडीने घेतलेली मते राष्ट्रवादीसाठी विचारप्रवर्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:11 PM

सोलापूर लोकसभा निवडणुक विश्लेषण; आगामी विधानसभेला ही आकडेवारी राष्ट्रवादीला विचार करायला लावणारी आहे.

ठळक मुद्देअनगरमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी यांना ७२ मते मिळाली, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ४ हजार ६४१ मते मिळालीशेटफळमधून भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींना १ हजार ५७६ मते मिळाली, सुशीलकुमार शिंदे यांना ९२७ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना २९५ मते मिळाली.

अशोक कांबळे

मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात उसळलेल्या मोदी लाटेमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सर्व विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली. परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांना १५ हजार ४२९ मतांची आघाडी देण्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यशस्वी झाले आहेत. असे असले तरी तालुक्यात नव्यानेच स्थापन झालेल्या बहुजन वंचित आघाडीने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून घेतलेली ३० हजार १४५ मते पाहता आगामी विधानसभेला ही आकडेवारी राष्ट्रवादीला विचार करायला लावणारी आहे.मोहोळ तालुक्यातून भाजप आणि काँग्रेसला मिळून एक लाख ११ हजार ३६८ मतदान झाले होते. त्यापैकी ५१ हजार  ३३९ मते भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना मिळाली, तर सुशीलकुमार शिंदे यांना ६० हजार ४५ मते मिळाली. 

मोहोळ तालुक्यातून ८ हजार ७१६ मतांची आघाडी शिंदे यांना मिळाली. पंढरपूर तालुक्यातून ६ हजार ४७९ तर उत्तर सोलापूर तालुक्यातून २३४ मतांची आघाडी असे मिळून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून १५ हजार ४२९ मतांची आघाडी सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली.

मोहोळ शहरातून भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींना ४ हजार ८०९ मते मिळाली, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ४ हजार ७७९ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना २ हजार ९ मते मिळाली. शहरातून २१३ मतांची भाजपला आघाडी मिळाली.

शेटफळमधून भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींना १ हजार ५७६ मते मिळाली, सुशीलकुमार शिंदे यांना ९२७ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना २९५ मते मिळाली. शेटफळमधून ६३९ मतांची भाजपला लीड मिळाली.

अनगरमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी यांना ७२ मते मिळाली, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ४ हजार ६४१ मते मिळाली तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना ३३७ मते मिळाली आहेत. हा आकडेवारी लक्षात घेता राष्टÑवादीला भविष्यात योजकपणे पावले टाकावी लागणार आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांना आघाडीभाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सर्व ठिकाणी मोठी आघाडी मिळाली असून, केवळ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना १५ हजार ४२९ मतांची आघाडी देत मोहोळ तालुक्यातून ८ हजार ७१६ मतांची आघाडी देत राष्टÑवादीची एकाकी खिंड राजन पाटील यांनी लढविली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूर