शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
3
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
4
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
5
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
6
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
8
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
9
वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस
10
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
11
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
12
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
13
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
14
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
15
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
16
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
17
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
18
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
20
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
Daily Top 2Weekly Top 5

पायी वारीसाठी फक्त दोन वारकऱ्यांना परवानगी, पंढरपुरात १७ ते २५ जुलैदरम्यान संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 07:45 IST

शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

सोलापूर: आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला बसने येणाऱ्या दहा पालख्यांसोबत ४०० वारकऱ्यांना येण्याची आणि वाखरीपासून प्रतिकात्मक पायी वारी करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष पायी वारी करण्यास प्रत्येकी दोन म्हणजे केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपूर शहरासह या परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. (Only two Warakaris allowed for wari, curfew in Pandharpur from 17th to 25th July)

शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. पंढरपूर शहरासह या परिसरातील भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, आदी गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार असून, अत्यावश्यक सेवांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

सर्व मानाच्या १० पालख्या १९ जुलैला वाखरी येथे दुपारी तीनपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतर वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हे तीन किलोमीटरचे अंतर पायी चालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दहा पालख्यांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे केवळ २० वारकऱ्यांनाच पायी वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर वारकऱ्यांना मात्र बसमधूनच पंढरपूरमधील आपापल्या मठाच्या ठिकाणी रवाना व्हावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा११ ते २८ जुलैदरम्यान पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहील. दहा पालख्या २४ जुलैला पंढरपूरहून परतीला निघतील. २० जुलैला आषाढी एकादशी असून, यादिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईची पूजा होणार आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरvarkariवारकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे