शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ओम गजानऩ़़ श्री गजानऩ़़

By admin | Updated: July 2, 2014 00:34 IST

शेगावच्या दिंडीचे उळेगावमध्ये स्वागत : वातावरण भक्तिमय बनले

सोलापूर : टप टप पावले टाकत निघालेले घोडे़़़ पताका हाती घेतलेले वारकरी़़़ फुलांनी सजलेली गजानन महाराजांची पालखी घेऊन ओम गजानऩ़़श्री गजानऩ़़ गजरात शेगावची दिंडी सोलापूर हद्दीवर उळेगावमध्ये मंगळवारी सायंकाळी दाखल झाली़ फटाके फोडून, गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत नागरिकांनी या दिंडीचे स्वागत केले़ गेल्या ४७ वर्षांपासून उळेगावच्या ग्रामस्थांकडून या दिंडीचे स्वागत होत आहे़ गावोगावी श्रींच्या पालखीचे स्वागत झाले़ याबरोबरच अन्नदानही झाले़ उळेगाव मार्गावर दिंडी येताच पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला़ वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचा एकेरी मार्ग केला गेला़ दिंडीत कुठेही बाधा येणार नाही याची काळजी घेतली गेली़ पांढरेशुभ्र वेशातील वारकरी, वीणेकरी, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर भगवा पताका आणि गजानन महाराजांचा जयघोष हे या दिंडीचे जणू वैशिष्ट्यच ठरले़ गावात दिंडी प्रवेश करताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले़ वेशीतून आत येताच दिंडीवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला गेला़ दक्षिण पंचायत समितीच्या सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील, उपसभापती आप्पा धनके, विभागीय पोलीस अधिकारी मनीषा डुबुले, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश जाधव, उळेगावचे सरपंच नर्मदा शिंदे, उपसरपंच बाळू शिंदे, ग्रामसेवक भाऊसाहेब कोल्हे यांनी दिंडीचे स्वागत केले़ त्यानंतर तलाठी कार्यालयासमोर मैदानामध्ये मंडपात दिंडी विसावली़ प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने आरती करून महाराजांचा जयजयकार केला गेला़ त्यानंतर दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली़ उळेगावच्या अवतीभोवतीचे ग्रामस्थांनीही दर्शनासाठी रांग लावली होती़ यावेळी महाप्रसादही वाटण्यात आला़ ------------------------------१४,१५८ गावांना भजनी साहित्यपंढरपूर येथे पालखी मुक्कामी आल्यानंतर गजानन महाराज संस्थानच्या वतीने दशमी, एकादशी आणि द्वादशी (बारस) ला जवळपास ३ लाख वारकऱ्यांना, भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येतो़ संस्थेकडून १० टाळजोड, वीणा, मृदुंग, हातोडी आणि संतसाहित्य श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत, तुकाराम महाराज गाथा दिल्या जातात़ आजपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील १४,१५८ गावांना संस्थेच्या वतीने भजनी साहित्य वितरित करण्यात आले आहे़ ----------------------------------बालगोपाळांकडून ‘चंपाकली’ची विचारणादरवर्षी एक हत्ती आणि हत्तीण या दिंडीसोबत यायचे़ घोडे, हत्ती असे प्राणी हे या दिंडीचे खास वैशिष्ट्य होते़ मागील वर्षी आजारी असल्याने हत्ती येऊ शकला नाही़ मात्र काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला़ मात्र मागील वर्षी ‘चंपाकली’ हत्तीण दिंडीला सोबत दिली होती़ तीन महिन्यांपूर्वी तिचाही मृत्यू झाला़ यंदा केवळ घोडे पाहायला मिळाले़ गावोगावी प्रत्येक ठिकाणी या दोन हत्तींची बालगोपाळांकडून विचारणा झाली़ उळेमध्येही हाच अनुभव आला़ या हत्तीणीने १५ वर्षे दिंडीची सेवा केली़ --------------------------------जनसेवेची विठ्ठल सेवायंदा जनसेवा संघटनेच्या वतीने वारकऱ्यांना हजार लाडू वाटप करण्यात आले़ संघटनेचे युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड, उद्योजक प्रशांत काळे-पाटील, प्रगतिशील बागायतदार प्रशांत जाधव, महमद पठाण उपस्थित होते़ तसेच लोकमंगल उद्योग समूहातर्फे गुलाबाच्या पाकळ्यांनी दिंडीचे स्वागत केले.