उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा
By Appasaheb.patil | Published: November 4, 2022 05:45 AM2022-11-04T05:45:25+5:302022-11-04T06:21:27+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान
पंढरपूर/सोलापूर : कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करता आली आहे.
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील ५० वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत आहेत. त्यांना दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
प्रबोधिनी एकादशी (कार्तिकी) निमित्त सजावट...
प्रबोथिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.