मुख्यमंत्र्यांविरुध्द अश्लील मजकूर; पंढरपुरातील एकाविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:27 IST2020-07-03T19:26:33+5:302020-07-03T19:27:35+5:30
पंढरपुरातील संदिप कुलकर्णी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांविरुध्द अश्लील मजकूर; पंढरपुरातील एकाविरुध्द गुन्हा दाखल
पंढरपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उद्देशून फेसबुक या सोशल मिडियावर अश्लील मजूकर लिहिल्याप्रकरणी पंढरपुरातील संदिप कुलकर्णी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली.
दरम्यान, पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदिप कुलकर्णी (रा. पंढरपूर) याने २ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उद्देशून इंग्रजीमध्ये अश्लील मजकूर सार्वजनिकरित्या पोस्टद्वारे फेसबुकवर प्रसारित केला आहे. हे पाहिल्यानंतर तानाजी मोहन मोरे (वय ३५, रा. छत्रपती शिवाजी चौक, पंढरपूर) यांनी पंढरपूर शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संदिप कुलकर्णी याच्याविरुध्द भा.दं.वि.क.२९४, ५०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि दत्तात्रय निकम करत आहेत.