शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

नान्नजमध्ये कोरोना बाधितांची संख्या ४३; तिºहे तांड्यातही आढळले १५ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 11:49 IST

उत्तर तालुक्यातील कोरोनाच्या संख्येत होतेय घट; नागरिक घेत आहेत काळजी...

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात आतापर्यंत ९०१ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्यानान्नजमध्ये रविवारी १२३ टेस्टमध्ये १५ तर मंगळवारी १०० टेस्टमध्ये १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेनान्नजमधील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे बाधितांची एकूण संख्या ४३ झाली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात आतापर्यंत ९०१ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये नान्नजमध्ये रविवारी १२३ टेस्टमध्ये १५ तर मंगळवारी १०० टेस्टमध्ये १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले़ यापूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्यांमध्ये ११ बाधित रुग्ण नान्नजमधीलच होते़ रॅपिड अँटिजेन तपासणीत मार्डीत ११४ मध्ये १०, कोंडीत ९७ मध्ये ५, तिºहे तांड्यावर १५, बीबीदारफळ येथे १३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

नान्नजमधील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ तालुक्यात अन्य गावात एकही बाधित रुग्ण आढळला नाही. पाकणी व तिºहे येथे रुग्ण वाढू लागल्यानंतर नागरिक सजग झाले. पाकणी ग्रामपंचायतीने सॅनिटायझर, मास्क तसेच जंतुनाशक फवारणी केल्याचे सरपंच शोभा गुंड यांनी सांगितले. बीबीदारफळ येथील प्रत्येकजण काळजी घेत असल्याचे डॉ. अभिजित साठे यांनी सांगितले.

वडाळा गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी निर्णय घेतला की त्याची अंमलबजावणी संपूर्ण गावकरी करतात. वडाळ्यात जनता कर्फ्यू, मास्क व सॅनिटायझरचा वापर ग्रामस्थ करतात. बाहेरगावच्या लोकांना गावात येण्यास बंदी आहे़- जितेंद्र साठे, उपसरपंच, वडाळा 

नान्नजमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे़ याचे कारण नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत़ त्यामुळे आता ४३ रुग्णसंख्या झाली आहे़ त्यामुळे नागरिकांनी गंभीर होऊन सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी़ - डॉ. संतोष बारसोळे,वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल