अब की बार...पुन्हा नको हे भाजप सरकार...सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:28 IST2018-11-07T12:22:39+5:302018-11-07T12:28:11+5:30

सोलापूर : दिवाळी सणात शहराच्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर निदर्शने करण्यात ...

Now times ... BJP government ... Shiv Sena's movement in Solapur | अब की बार...पुन्हा नको हे भाजप सरकार...सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

अब की बार...पुन्हा नको हे भाजप सरकार...सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

ठळक मुद्दे- शिवसेनेने दिली भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी- शहरात सुरळीत पाणीपुरवठ्यावरून शिवसेना आक्रमक- सत्ताधारी भाजप सरकारचा केला निषेध

सोलापूर : दिवाळी सणात शहराच्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर निदर्शने करण्यात आली़ शिवसेनेचा बाऱ़़भाजपचा फुसका बाऱ़क़ुठे नेऊन ठेवलाय पाणीपुरवठा आमचा़़़अबकी बाऱ़ग़ाजर सरकार अशा घोषणा उपस्थित शिवसैनिकांनी दिल्या़ 
यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, नगसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी, विजय पुकाळे, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, बाळु गायकवाड, लहु गायकवाड, दत्तात्रय खलाटे, संताजी भोळे, जरगिश मुल्ला आदी उपस्थित होते़


 

Web Title: Now times ... BJP government ... Shiv Sena's movement in Solapur