आता भाजपा ही म्हणतेय राष्ट्रवादीच्या नेत्याने ही केला आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 12:51 IST2020-12-03T12:51:36+5:302020-12-03T12:51:41+5:30

माजी आमदार दिपक साळुखे-पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केला; भाजपने केली तक्रार

Now the BJP says that the NCP leader has violated the code of conduct | आता भाजपा ही म्हणतेय राष्ट्रवादीच्या नेत्याने ही केला आचारसंहितेचा भंग

आता भाजपा ही म्हणतेय राष्ट्रवादीच्या नेत्याने ही केला आचारसंहितेचा भंग

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून खासदार जयसिध्देश्वर स्वामी यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार दिपक साळुखे-पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यांच्या विरूध्द देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचे मतदान चालू असताना राष्ट्रवादीचे नेते दिपक साळुखे-पाटील यांनी मंगळवेढा येथील भाग क्र ३९४, ३९५, ३९६ या बुथवरती आत जावून बॅलेट पेपरचेक केले. बुथ मध्ये फिरून आले. सदर ठिकाणी आचार संहितेचा भंग केला आहे. हा सर्व प्रकार सी.सी. टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी. असे निवेदन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर जिल्हाधिकारी निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे.

याबाबत माजी आमदार दिपक साळुखे-पाटील यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Web Title: Now the BJP says that the NCP leader has violated the code of conduct