आरक्षित जागेवरील घराच्या टॅक्स आकारणीसाठी सहकारमंत्र्यांना महापालिका बजावणार नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:19 PM2019-09-28T12:19:22+5:302019-09-28T12:23:08+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुुरुवात झाली आहे.

Notice to cooperate ministerial municipality for levy of house tax on reservation | आरक्षित जागेवरील घराच्या टॅक्स आकारणीसाठी सहकारमंत्र्यांना महापालिका बजावणार नोटीस 

आरक्षित जागेवरील घराच्या टॅक्स आकारणीसाठी सहकारमंत्र्यांना महापालिका बजावणार नोटीस 

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुुरुवात झाली आहेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावे शहरात जवळपास १० मिळकती याप्रकरणी काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी होटगी रोडवर आरक्षित जागेवर बांधलेल्या घराच्या मिळकत कर आकारणीसाठी महापालिका विशेष नोटीस बजावणार आहे. ही नोटीस देशमुखांना मान्य झाली तर कर आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती कर आकारणी कार्यालयातील अधिकाºयांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार मिळकत करासह इतर करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करीत आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावे शहरात जवळपास १० मिळकती आहेत. या मिळकतींकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महापालिकेकडून देण्यात आले आहे. होटगी रोडवर अग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुखांनी बांधकाम केले आहे. या जागेवरील आरक्षण अद्याप कायम आहे. महापालिकेने न्यायालयात तशी माहिती दिली आहे. याप्रकरणी काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या कर आकारणी विभागाने काही दिवसांपूर्वी या जागेवरील बांधकामाची मोजणी केली. देशमुखांनी २०१२ साली या जागेवरील बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला होता. या परवान्यानुसार बांधकाम झाले आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. जवळपास सात हजार स्क्वेअर फुटावर बांधकाम करण्यात आले आहे. २०१२ पासून सप्टेंबर २०१९ या कालावधीपर्यंत पाच ते साडेपाच लाख रुपये मिळकत कराची आकारणी होते. या आकारणीची विशेष नोटीस देशमुखांना देण्यात येईल. या नोटिसीनुसार आकारणी मान्य झाल्यास वसुली करण्यात येणार असल्याचे कर आकारणी विभागातील अधिकाºयांनी सांगितले. न्यायालयीन सुनावणीत या घराचे बांधकाम अनियमित ठरल्यास काय करणार, असे विचारले असता कर आकारणी अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे बोट दाखविले. 

यांना नाहरकत प्रमाणपत्र
- कर आकारणी विभागाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, श्रीशैल हत्तुरे यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. या शिवाय भाजपचे नगरसेवक डॉ. किरण देशमुख, एमआयएमच्या नगरसेविका वाहिदाबी भंडाले, फारुक शाब्दी, तस्लिम शेख, नागेश पासकंटी, दत्तात्रय वाघमारे, सल्लाउद्दीन शेख, आनंद चंदनशिवे, शोभा शिंदे यांनी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. 

Web Title: Notice to cooperate ministerial municipality for levy of house tax on reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.