शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:26 IST

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

ठळक मुद्देपंढरपूर तालुका - इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगाबार्शीला जोडणारा एकही रस्ता नाही धडधाकटअक्कलकोट तालुक्यात खड्डे इतके की गावात पोहोचायला लागतो तिप्पट वेळ 

सोलापूर : दळणवळणाच्या दृष्टीने राज्य-महामार्ग, खेडोपाड्यांचे रस्ते हे मुख्य श्वास म्हणून ओळखले जातात; मात्र हे केवळ कागदोपत्री आहे की काय असा प्रश्न आता गावगड्यापासून ते शहरांपर्यंत सर्वांनाच पडू लागला आहे. लालफितीच्या कारभारामध्ये रस्ता नावाच्या कामासाठी प्राधान्य द्यावे लागते हे कुणाच्याच गावी नसावे, अशी स्थिती जिल्हाभरात ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पुन्हा  मलमपट्टी करायची.. लाखो रुपयांचा चुराडा.. प्रत्यक्ष एका पावसातच रस्त्याची वाट लागते, अशा बोलक्या प्रतिक्रिया गावोगावच्या तरुणाईपासून वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांपासून व्यक्त करण्यात आल्या. वर्षात एकाच मार्गावरील रस्त्यावर तीन-तीन वेळा दुरुस्ती करायची आणि बिले उचलायची अशीही तºहा असल्याचेही लोकांमध्ये कुजबुज आढळून आली. या साºया प्रकारामध्ये काही अपवाद वगळले तर खडीचा पत्ता नाही.. खड्ड्यांची तर गिनतीच नाही. अनेक ठिकाणी कधीकाळी केलेले डांबरी केव्हाच वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. 

पंढरपूर तालुका - इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगापंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रोज हजारोंच्या संख्येने भाविकांची ये-जा असते़ मात्र शहराला जोडणारे रस्ते खड्डेमय बनले आहेत़ वाखरी परिसरात एक दुचाकीस्वार खड्डा चुकविताना गाडीवरून पडला़ त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘अहो साहेब, इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगा’ असा सवाल केला़ या नागमोडी वळणे घेण्याच्या नादात गाडी घसरून पडल्याचे त्यांनी सांगितले़

बार्शीला जोडणारा एकही रस्ता नाही धडधाकटबार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शी शहरातून सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, परांडा, भूम, मोहोळ या चारही दिशेला जाणाºया राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या सर्वच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हे अंतर काटण्यासाठी तिप्पट वेळ लागत आहे़ तसेच वाहनधारकांना वाहन चालवताना देखील कसरत करावी लागत आहे़ या प्रकारामुळे गावोगावच्या नागरिकांपासून वाहनधारक वैतागले आहेत. बार्शी हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी एक व्यापारीपेठ आहे. शहरात नेहमीच वाहनांची सतत वर्दळ असते़ शहरातील रस्ते तर भुयारी गटारी योजनेच्या कामांमुळे खराब झालेच आहेत; मात्र बार्शी शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी केवळ लातूर-कुर्डूवाडी हा राज्यमार्ग सोडला तर एकही रस्ता सुस्थितीत नाही़ मागील वर्षी या रस्त्याचे काम झाल्यामुळे तो चांगला आहे़ 

अक्कलकोट तालुक्यात खड्डे इतके की गावात पोहोचायला लागतो तिप्पट वेळ अक्कलकोट :  तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच रस्ते चांगले आहेत.  बहुतांश रस्ते अर्थात तालुक्यातील एकूण ३०० किलोमीटर रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ जीवनवाहिनी समजल्या जाणाºया रस्त्यांची चांगलीच वाट लागली आहे. यामुळे दळणवळणाचे प्रमाण घटले आहे़ तडवळसह इतर भागात जैसे थे स्थिती आहे़ मागील ७ वर्षांत या रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. या खराब रस्त्यांकडे लोकप्रतिनिधी ना अधिकारी कोणीच वाली राहिलेला नसल्याची खंत तालुकावासीयातून व्यक्त होत आहे.

करमाळा - वर्षातून झाली तीनवेळा रस्त्याची डागडुजीकरमाळा : परतीच्या पावसाने अहमदनगर-टेंभुर्णी राज्यमार्गावरील कंदर ते जातेगाव व करमाळा ते पुणे मार्गावर वीटदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा रस्त्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनसुध्दा रस्त्यावर खड्डे कसे काय पडतात, असा सवाल नागरिकांसह वाहनचालकांमधून होत आहे.  अहमदनगर ते जातेगावपर्यंतचा संपूर्ण ७५ कि.मी.च्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या उखडल्या आहेत. अहमदनगरहून करमाळ्यास येण्यासाठी चांगला रस्ता असताना दीड तास वेळ लागायचा, पण आता खड्ड्यांमुळे तीन तास लागत आहेत. 

माढा - टाकला मुरुम बुजवले खड्डे ; खेड्यांना जोडणाºया रस्त्यांची लागली वाट

कुर्डूवाडी : पडलेल्या परतीच्या पावसामुळे माढा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते आहे़ शहरांना जोडणारे काही मुख्य मार्ग वगळता खेड्यांना जोडणारे बहुतांश मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत त्यांची वाट लागली आहे. दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकbarshi-acबार्शीkarmala-acकरमाळाmadha-acमाढाpandharpur-acपंढरपूर