शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

coronavirus; अंत्यसंस्काराचे साहित्य मिळेना; ३३ तास मृतदेह ठेवावा लागला घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:17 IST

मोदीतील वाहनचालकाची दुर्दैवी कहाणी; रिक्षाचालकाच्या बाळाच्या अंत्यसंस्काराला चारच लोक 

ठळक मुद्देकोरोनाविरोधात बाजारपेठाही बंद. अंत्यसंस्काराचे साहित्य पुरविणारेही दुकान बंद सकाळी त्याच्या आईवडिलांनी अंत्यविधीच चक्क ३३ तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलादोन दिवसांत अंत्यसंस्कार हे सरणावरती करण्याऐवजी विद्युतदाहिनीवर भर

काशिनाथ वाघमारे सोलापूर : दुर्धर आजाराने घेरल्याने युवकाने जीव सोडला..क़र्ताच गेल्याने कुटुंब पोरके झाले़..कोरोनाविरोधात सरकारने केलेल्या आवाहनामुळे कोणीच बाहेर पडेना..क़र्नाटकातीत पाहुणेही पोहोचेनात... भरीस भर म्हणून की काय अंत्यसंस्कारासाठीचे साहित्य दुकानही बंद...अशा जटील परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाने वाहनचालकाचा अंत्यविधीच चक्क ३३ तास पुढे ढकलला.ही दुर्दैवी कहाणी आहे सिद्धेश्वर साईबाबा जमादार (वय ३०, रा. मधुकर उपलप वस्ती, शासकीय गोडावूनजवळ) असे दुर्धर आजाराने मरण पावलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

सिद्धेश्वरचे वडील साईबाबा हेदेखील वाहन चालवतात. गरिबीशी तोंड देत सिद्धेश्वरने थोडेफार शिक्षण घेतले़ त्यानंतर तोही वाहन चालवायला शिकला़ काही दिवसांपूर्वी त्याला कर्करोग जडल्याचे तपासणीत स्पष्ट झाले़ यातून तो बरा होऊ शकला नाही़ होटगी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी मध्यरात्री १ वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला.

दरम्यान, या सप्ताहाभरापासून कोरोनाविरोधात सर्वत्र हालचाली सुरु होत्या़ या काळात सर्वसामान्यही बाहेर पडायला टाळताहेत़ २२ मार्च रोजी कोणीही सकाळी ६ ते रात्री ९ यादरम्यान बाहेर पडू नका, असे सरकारने आवाहन केले़ या आवाहनानुसार आदल्यादिवसापासूनच सीमावर्ती भागात नाकेबंदी सुरु झाली. वाहनेदेखील जवळपास बंद झालेली. अशातच सिद्धेश्वरच्या अंत्यविधीसाठी त्याच्या नातेवाईकांना विजयपूर, रायचूर आणि मंद्रुप परिसरातून येण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध होईना. इकडे आजही कुटुंबीय दूरवरच्या पाहुण्यांची वाट पाहताहेत. शिवाय जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी अंत्यसंस्काराचे साहित्य आणायला बाहेर पडले़, परंतु कोरोनाविरोधात बाजारपेठाही बंद. अंत्यसंस्काराचे साहित्य पुरविणारेही दुकान बंद असल्याने रविवारी सकाळी त्याच्या आईवडिलांनी अंत्यविधीच चक्क ३३ तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

रिक्षाचालकाच्या बाळाच्या अंत्यसंस्काराला चारच लोक कोरोनाचा प्रादुर्भाव टाळताना दुसरा अनुभव आला तो रिक्षाचालकाच्या बाबतीत. जिजामातानगर येथील विश्वास सोनवणे यांच्या पत्नी गरोदर होत्या़ रुग्णालयात त्या प्रसूत झाल्या़ या एक दिवसाच्या अर्भकाचाही मृत्यू झाला़ सिद्धेश्वर जमादारच्या वाटेला आलेली परिस्थिती सोनवणे यांच्या वाटेला आली़ त्यांचे डॉक्टर बंधू, आई आणि विश्वास असे चौघेच स्वत:च्या रिक्षातून मोदी स्मशानभूमीत आले़ कोरोनाच्या भीतीने कोणीच बाहेर पडले नाही़ काहींनी जमावबंदीचा अर्थ दंगलीतील ‘कर्फ्यू’सदृश स्थिती असा काढून बाहेर पडणे टाळले़ अंत्यसंस्कार आटोपून सोनवणे कुटुंबाने मोदीतून घरची वाट धरली़ 

विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कारदरम्यान, मोदी येथील स्मशानभूमीत डोकावले असता दोन दिवसांत अंत्यसंस्कार हे सरणावरती करण्याऐवजी विद्युतदाहिनीवर भर दिला़ शनिवारी या स्मशानभूमीत तीन मृतदेह जाळण्यात आले तर दोन मृतदेहांचे अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीत करण्यात आले़ रविवारीदेखील एक अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत तर एकाला सरणावरती भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार उरकण्यात आले़ हे सारे परिणाम केवळ कोरोनाचे असल्याच्या प्रतिक्रिया स्मशानभूमीची देखभाल करणाºयांतून उमटल्या़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू