धक्कादायक; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील नऊ पोलिसांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:20 PM2020-05-11T15:20:08+5:302020-05-11T15:24:01+5:30

‘खाकी’तील बाधितांची संख्या आता सतरा; संपर्कातील पोलीसांना होम क्वारंटाईन

Nine policemen from the Solapur rural police force were hit by a corona | धक्कादायक; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील नऊ पोलिसांना कोरोनाची बाधा

धक्कादायक; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील नऊ पोलिसांना कोरोनाची बाधा

Next
ठळक मुद्देएमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या संपर्कातील २0 जणांची तपासणी दोघांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेतकर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना पीपीई किट दिले आहे

सोलापूर :  ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले मात्र शहरातील पोलीस वसाहतीमध्ये राहणाºया दोन पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली. हा प्रकार उघड होतो तोच अन्य तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. ग्रामीण पोलीस दलात एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह असताना रविवारी अचानक ९ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांपैकी एका कर्मचाºयाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या ग्रामीण पोलीस दलातील एकूण १३ कर्मचारी तर शहरातील ४ पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. बाधित कर्मचाºयांच्या संपर्कातील ३५ पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी शहरात राहणारे आहेत.

पोलीस आयुक्तालयातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाºयाचा मृत्यू झाला. अधिकाºयाचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाल्याचे निष्पन्न झाले. अधिकाºयाच्या नातेवाईकांना व संपर्कातील लोकांचा शोध घेऊन २0 जणांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. २0 जणांमध्ये दोन पोलीस कर्मचाºयांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. ९ मे रोजी आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या कर्मचाºयाला सारी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सध्या शहर पोलीस खात्यात ४ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत. 

११३ कर्मचाºयांना बसविण्यात आले घरी
- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण पोलीस दलात ५५ व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ११३ कर्मचाºयांना घरी बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एक आठवड्यापासून ही मंडळी घरी बसून आहेत. पुढील दोन आठवडे त्यांना घरी राहण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिसांची घेतली जातेय काळजी : मनोज पाटील 
- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्यांच्या सुरक्षेसाठी हायड्रोक्लोरी क्लीन, अ‍ॅल्सोलिक अ‍ॅल्बम, आयुर्वेदिक काढा आदी औषधे दिली जात आहेत. उत्साह राहण्यासाठी प्रोटिनची बिस्किटे दिली जात आहेत. आता चवणप्राश दिले जाणार आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाºयाला ६ मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे. पोलीस स्टेशनमध्येही सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या संपर्कातील २0 जणांची तपासणी केली आहे. दोघांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना पीपीई किट दिले आहे. 
- सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे.

आंबेडकरनगर येथील पोलीस वसाहत सील
- रमाबाई आंबेडकरनगर येथील मंत्री चंडक पोलीस वसाहतीमध्ये ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी राहतात. या वसाहतीमध्ये एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण वसाहत सील करण्यात आली आहे.

Web Title: Nine policemen from the Solapur rural police force were hit by a corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.