बायकोशी भांडणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्यांनी खोऱ्याच्या दांडक्यानं धुतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 17:15 IST2024-01-02T17:15:14+5:302024-01-02T17:15:44+5:30

शेतातील वस्तीवर ही घटना घडली.

Neighbors hit the husband who was quarreling with his wife with a rod in solapur | बायकोशी भांडणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्यांनी खोऱ्याच्या दांडक्यानं धुतलं

बायकोशी भांडणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्यांनी खोऱ्याच्या दांडक्यानं धुतलं

रवींद्र देशमुख,सोलापूर : नवरा-बायकोचं भांडण सुरू असताना ‘तुम्ही सारखं भांडणं का करता?’ म्हणून शेतातील वस्तीवर राहणाऱ्या शेजाऱ्यांनी नागेश तानाजी साळुंखे (वय ३०, रा. खुनेश्वर) याला खोऱ्याच्या दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. यात तो जखमी झाला. मंगळवारी सुमारास खुनेश्वर (ता. मोहोळ) येथे शेतातील वस्तीवर ही घटना घडली.

यातील जखमी नागेश यांचे भांडण सुरू होते. नेहमीच त्यांची भांडणे होत असल्याने शेजारी राहणाऱ्या दोघांनी त्याला विचारणा करीत त्याला खोऱ्याच्या दांड्याने डोक्यात मारल्याने त्याला जखम झाली. तसेच सर्वांगास मुका मार लागला. जखमी अवस्थेत नागेश यास मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. तेथून डॉक्टरांनी सल्ला दिल्याने तो स्वत: सोलापुरात शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Neighbors hit the husband who was quarreling with his wife with a rod in solapur