'राष्ट्रवादी'च्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटील यांनी साधला संवाद

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 18, 2024 17:50 IST2024-07-18T17:49:27+5:302024-07-18T17:50:00+5:30

त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या पुन्हा एकदा मुलाखती घेऊ, असे यावेळी त्यांनी सांगितले.

ncp sp jayant patil interacted with interested candidates for next vidhan sabha election in the meeting | 'राष्ट्रवादी'च्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटील यांनी साधला संवाद

'राष्ट्रवादी'च्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटील यांनी साधला संवाद

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा गुरुवारी  मेळावा झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विधानसभानिहाय इच्छुक उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार द्यायचा, याचा निर्णय घेऊ. त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या पुन्हा एकदा मुलाखती घेऊ, असे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढयाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खराटमल, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर एड. यु. एन. बेरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: ncp sp jayant patil interacted with interested candidates for next vidhan sabha election in the meeting