निसर्गप्रेमींची हाक; मुठभर दाणे अन् ओंजळभर पाणी; पक्षी-प्राण्यांसाठी अभियान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 02:43 PM2019-03-06T14:43:35+5:302019-03-06T14:46:14+5:30

सोलापूर : विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून ...

Nature's love; Filled whole grains and water; Birds and animals campaign ..! | निसर्गप्रेमींची हाक; मुठभर दाणे अन् ओंजळभर पाणी; पक्षी-प्राण्यांसाठी अभियान..!

निसर्गप्रेमींची हाक; मुठभर दाणे अन् ओंजळभर पाणी; पक्षी-प्राण्यांसाठी अभियान..!

googlenewsNext
ठळक मुद्देघरासमोर, टेरेसवर पाणी भरलेले भांडे अन् शेतात करा पाणवठेविदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय.

सोलापूर: विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून प्रत्येक जण आपल्या परीनं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र मुक्या पक्ष्यांचं.. रानावनात भटकंती करणाºया प्राण्यांचं काय? नेमका हाच प्रश्न घेऊन निसर्ग माझा सखा परिवार आणि अन्य निसर्गप्रेमींनी ‘मुठभर दाणे अन् ओंझळभर पाणी’ या अभियानाद्वारे सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.

आज माणसाचं निसर्गाकडे कळत-नकळत होणारं दुर्लक्ष आणि त्यामुळे दिवसेंदिवस कमी होणारं पावसाचं प्रमाण याचा मनुष्याबरोबरच मुक्या बिचाºया वन्यजीव प्राणी अन् पक्ष्यांनाही होतोय. याची जाणीव आपल्या सर्वांनाच असणे गरजेचे आहे. पक्षी उडत असल्याने त्यांची पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. चांगले पाणी मिळाले तर त्यांची पचनसंस्था व्यवस्थित राहते. बºयाच वेळेस पाण्याअभावी ग्लानी येऊन खाली पडण्याचे प्रकारही घडतात, असे आवाहन ‘निसर्ग माझा सखा’चे अरविंद म्हेत्रे यांनी केले.

काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ आणि ‘निसर्ग माझा सखा’च्या वतीने चिमणीसाठी कृत्रिम घरटी बनविण्याचे प्रशिक्षण दिलं गेलं. शेकडो घरटी बसविण्यात आली. चिमण्यांनी जवळपास बहुतांश घरटी स्वीकारल्याचे दिसून आले. या घरट्यांच्या माध्यमातून चिमण्यांचा अधिवास झाला. अनेक घरट्यांमध्ये पिलं दिसून येताहेत, असे म्हेत्रे यांनी सांगितले.

कोणत्याही ऋतूमध्ये विशेषत: उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये झाडाखाली ‘पाणथळे’ बनवावेत. प्रत्येकाने आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवावे, त्यांच्यासाठी घरटी बसवावीत. त्यांना खायला नैसर्गिक अन्न ठेवायला हवं. या पृथ्वीतलावर मानवाला राहण्याचा जितका अधिकार आहे तितकाच प्रत्येक सजीवाला आहे. त्यामुळे एक कर्तव्य म्हणून आपण या साºया गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांनी सांगितले.

सोलापूरकरहो, घ्या मनावर!
- दैनंदिन जीवनात आपण पाण्याचा वापर किती आणि कसा करतो, याचा विचार करूयात. किमान एक ग्लास पाणी पिण्यासाठी घेता, त्यातला किमान पाव हिस्सा तरी पाणी आपण सांडतो. आता उन्हाळ्यात पाणी जपून वापरा अन् सांडणारे पाणी वाचवून प्रत्येकाने किमान एकतरी ग्लास आपल्या छतावर ठेवले तर पाण्यासाठी भटकंती करणाºया चिऊतार्इंसह अनेक पक्ष्यांची तहान भागू शकते. तर आजपासून प्रत्येकानेच मनावर घ्यावं, असं आवाहन निसर्गप्रेमींनी केलं आहे.

Web Title: Nature's love; Filled whole grains and water; Birds and animals campaign ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.