नरेंद्र मोदी सोलापुर दौºयावर; हेलिकॉप्टर उतरणार थेट होम मैदानावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:00 IST2019-01-08T10:57:37+5:302019-01-08T11:00:44+5:30
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर होटगी रोड विमानतळाऐवजी होम मैदानावर उतरणार आहे. तिथून डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, ...

नरेंद्र मोदी सोलापुर दौºयावर; हेलिकॉप्टर उतरणार थेट होम मैदानावरच !
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर होटगी रोड विमानतळाऐवजी होम मैदानावर उतरणार आहे. तिथून डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, नवीवेस पोलीस चौकीमार्गे पार्क स्टेडियमवर येणार आहेत. परत जाताना अडथळा होऊ नये यासाठी चार हुतात्मा पुतळा येथील रस्ता दुभाजक फोडण्यात आला आहे. विशेष सुरक्षा दलाने दिलेल्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी बुधवारी सकाळी सोलापुरात येत आहेत. बिदरहून सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल, असे सोमवारी सायंकाळपर्यंत सांगण्यात येत होते. परंतु, सोमवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, मोदींचे हेलिकॉप्टर होम मैदानावर उतरेल. त्यासाठी होम मैदानावर हेलिपॅडही तयार करण्यात येत आहे. होम मैदानावरुनडफरीन चौक, महापौर बंगला, रेल्वे स्टेशन, नवीवेस पोलीस चौकीपासून चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत वाहनांचा ताफा येणार आहे.