शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

अंगावर पिकअप घालून पोलीस शिपायाचा खून; सोलापुरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 19:23 IST

चालकाला केली मंद्रुप पोलिसांनी अटक;  विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट

ठळक मुद्देकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी वडकबाळ नाकाबंदी व मंद्रुप पोलीस ठाण्याला भेट नाकाबंदीला असलेल्या कर्मचाºयाला कोरोना झाल्याने वडकबाळ चेकपोस्ट चर्चेत आला होताआता पोलीस शिपायाच्या खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

सोलापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विजयपूर महामार्गावर वडकबाळ येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीतील पोलीस शिपायाच्या अंगावर पीकअप घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी पीकअप चालकास अटक केली आहे. 

रामेश्वर गंगाधर परचंडे (वय ३0, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांची नेमणूक सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी वडकबाळ येथे जिल्हाबंदीसाठी नाकाबंदी लावली आहे. या ठिकाणी २२ मे रोजी पहाटे ४ वाजता पोलीस शिपाई परचंडे हे पोलीस नाईक लक्ष्मण कोळेकर, होमगार्ड स्वप्नील गिरी, दिनेश रास्ते यांच्यासह नाकाबंदी करीत होते. पावणेपाच वाजता तेरामैलकडून सोलापूरकडे निघालेली एक पीकअप भरधाव वेगाने तिथे आली. पोलीस नाईक कोळेकर यांनी ईशारा करूनही चालकाने पीकअप थांबविली नाही. पीकअपच्या पाठीमागे फळ्या लावलेल्या होत्या व नंबरप्लेट खोडलेली होती. संशय आल्याने पोलीस शिपाई परचंडे व होमगार्ड रास्ते यांनी मोटरसायकलवरून पीकअपचा पाठलाग केला. पोलीस येत आहेत, असे पाहून चालकाने पीकअप समशापूर ते नंदूर रस्त्याने घेतली. महामागार्पासून २00 मीटर अंतरावर परचंडे यांनी पाठलाग करून पीकअप अडविली.

चालकाने पीकअप थांबविल्याचे पाहून परचंडे मोटरसायकलवरून खाली उतरून चालकाकडे जात असताना चालकाने पीकअप वेगाने दामटली. यात पीकअपचा धक्का बसून परचंडे खाली पडले व चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. होमगार्ड रास्ते यांनी ही माहिती दिल्यावर नाईक कोळेकर घटनास्थळी आले व त्यांनी सपोनि धांडे यांना ही माहिती दिली. धांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खाजगी वाहनातून परचंडे यांना सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

याप्रकरणी पोलीस नाईक कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौस नबीलाल कुरेशी (वय ३१, रा. बाशापेठ, सोलापूर) याच्याविरूद्ध खून करण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चालक गौस याला अटक केली आहे. उपचार सुरू असताना परचंडे हे शनिवारी पहाटे मरण पावले. त्यामुळे आता चालक गौस याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी हवालदार शिंदे यांनी सांगितले. 

विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेटया प्रकरणाची माहिती देताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी वडकबाळ नाकाबंदी व मंद्रुप पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती दिली. यापूर्वी नाकाबंदीला असलेल्या कर्मचाºयाला कोरोना झाल्याने वडकबाळ चेकपोस्ट चर्चेत आला होता. आता पोलीस शिपायाच्या खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस