माहेरहुन पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा गळा दाबून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:10 IST2018-07-12T14:09:04+5:302018-07-12T14:10:08+5:30

माढा तालुक्यातील शेडशिंगे येथील घटना

The mother did not bring money so she got married and then murdered her | माहेरहुन पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा गळा दाबून केला खून

माहेरहुन पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा गळा दाबून केला खून

ठळक मुद्देमोनिका गोंडगिरे असे मृत विवाहित महिलेचे नावपतीसह सासरा, सासुविरूध्द गुन्हा दाखलकुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुर्डूवाडी : माहेरहून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता माढा तालुक्यातील शेडशिंगे येथे घडली. मोनिका सत्यवान गोंडगिरे (वय-२२) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. 

याप्रकरणी पती सत्यवान, सासरा सूर्यभान आणि सासू सिंधू गोंडगिरे यांच्यावर कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १९ मे २०१४ ते ११ जुलै २०१८ या कालावधीत आरोपींनी मयत सोनिकाकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. यावरुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. बुधवारी सकाळी पुन्हा पैशावरुन आरोपींनी तिचा छळ केला. त्यानंतर दुपारी १२ वाजता पती सत्यवान याने आई-वडिलाच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला.

मयत मोनिकाचे वडील विलास गणपत भालेराव (वय-४७, रा. नेमतवाडी ता.पंढरपूर) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. तपास सपोनि केंद्रेकर हे करीत आहेत.




 

Web Title: The mother did not bring money so she got married and then murdered her