आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 19, 2023 12:52 IST2023-09-19T12:52:42+5:302023-09-19T12:52:56+5:30

दिव्यांग बांधवांसाठी हा जिल्हास्तरीय मेळावा असून यात शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जाईल.

MLA Bachu Kadu in Solapur tomorrow; Organization of 'Government Apalya Dari' | आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन

आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन

सोलापूर : राज्य शासनाने 'शासन दिव्यांगांच्या दारी' या उपक्रमाचे सोलापुरात आयोजन केले असून आमदार बच्चू कडू यांच्याहस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. बुधवारी, २० सप्टेंबर रोजी येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात उपक्रम नियोजित आहे.

दिव्यांग बांधवांसाठी हा जिल्हास्तरीय मेळावा असून यात शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जाईल. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. राज्यातील दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा, या भूमिकेतून आ. कडू यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात या अभियानातून दिव्यांगांना त्यांच्या मागणीनुसार ३२ हून अधिक शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.

Web Title: MLA Bachu Kadu in Solapur tomorrow; Organization of 'Government Apalya Dari'