शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

मिशन ११ वी प्रवेश..सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:37 PM

पहिल्या दिवशी ५,४४८ फॉर्म विक्री; पाठोपाठ वाणिज्य, कला, संयुक्त शाखेचा नंबर

ठळक मुद्देशहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणारइंटरनेटवरून काढलेली गुणपत्रिका प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासाठी पात्र असणार

सोलापूर: दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला अन् आता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. बुधवारपासून इयत्ता ११ वीच्या   प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विविध महाविद्यालयांमधून एकूण ५  हजार ४४८ फॉर्मची विक्री झाली आहे. यामध्ये विज्ञान शाखेसाठी ३१७२, वाणिज्य शाखेसाठी  १८२०, कला शाखेसाठी २७७ तर संयुक्त शाखेसाठी १७९ प्रवेश  फॉर्म विद्यार्थ्यांनी घेऊन गेल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

शहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. इंटरनेटवरून काढलेली गुणपत्रिका प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. बुधवारी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत फॉर्म विक्रीला प्रारंभ झाला. 

पहिल्या दिवशी वालचंद महाविद्यालयामधून विज्ञान शाखेसाठी १३६७ अर्ज विद्यार्थ्यांनी नेले. त्यापाठोपाठ ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयातून ४३६, डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालयातून ४३० अर्जांची विक्री झाली. या तिन्ही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. कला शाखेसाठी वालचंद महाविद्यालयातून १०३ अर्ज नेण्यात आले. गुरुवारपासून फॉर्म विक्रीला वेग येईल, असे जि.प. शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

कोणत्या महाविद्यालयातून किती अर्जांची विक्री-  शहरातल्या विविध महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नेलेले अर्ज असे- व्ही. जी. शिवदारे कनिष्ठ महाविद्यालय: (विज्ञान शाखा- ८०), स्वामी विवेकानंद कला, विज्ञान महाविद्यालय: (कला- ११, विज्ञान शाखा- २२, संयुक्त: ३३), शरदचंद्र पवार महाविद्यालय (कला- १, वाणिज्य- २), हरिभाई देवकरण महाविद्यालय: (कला- ६२, विज्ञान- १६७, वाणिज्य- १५०), संगमेश्वर महाविद्यालय: कला- १०, विज्ञान- २०७, वाणिज्य- ८२), रामकृष्ण बेत नाईट कॉलेज (संयुक्त- १), एसईएस कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान- १४५, संयुक्त- ६), डीबीएफ दयानंद कॉलेज (कला- ६५, विज्ञान- ४३०), ए. डी. जोशी महाविद्यालय (विज्ञान- ४३६), अलकनंदा जोशी कॉलेज (विज्ञान- १०५), वालचंद कॉलेज (कला- १०३, विज्ञान- १३६७), भारती विद्यापीठ (विज्ञान- १७७, संयुक्त- १४०), कुचन महाविद्यालय (कला- २६, विज्ञान- ३६, संयुक्त - वाणिज्य- १४०), डीएव्ही वेलणकर कॉलेज (वाणिज्य- २८६), हिराचंद नेमचंद कॉलेज (वाणिज्य- ११६२).

असे आहे नियोजन

  • - २४ ते २८ जूनदरम्यान भरलेले अर्ज महाविद्यालयात जमा करायचे आहेत. यावेळी दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत देणे गरजेचे आहे. २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीन स्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
  • - पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला सादर करायचा आहे.
  • - दुसरी गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलैदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तिसºया गुणवत्ता यादीनुसार ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाSSC Resultदहावीचा निकाल