चमत्कार सारखा सारखा होत नाही; सोलापुरात भाजपचाच महापौर होईल..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:00 IST2019-11-28T15:58:17+5:302019-11-28T16:00:08+5:30
विजयकुमार देशमुख यांनी उडविली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची खिल्ली

चमत्कार सारखा सारखा होत नाही; सोलापुरात भाजपचाच महापौर होईल..!
ठळक मुद्दे- सोलापूर महापालिकेत महापौर पदाच्या निवडीबाबत जोरदार हालचाली सुरू- सोलापूर महापालिकेतील राजकीय घडामोंडींना आला वेग- भाजपचाच महापौर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे
सोलापूर : महापालिकेत भाजपकडे बहुमत आहे. भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.
महापालिकेत महाआघाडीचा चमत्कार होईल की नाही माहीत नाही, पण कधी तर एकदा चमत्कार झाला म्हणून सारखा सारखा चमत्कार होत नाही, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली. भाजपचे ४९ नगरसेवक आहेत. हे सर्व भाजपसोबत राहतील. सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मोदी सरकारकडून आणखी निधी आणून शहरात कामे होतील, असेही त्यांनी सांगितले.