शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाणी अक्कलकोटमध्ये वाया

By admin | Updated: June 30, 2014 13:55 IST

अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते.

पाण्याचा योग्य वापर करा !

शंकर हिरतोट ■ अक्कलकोट
अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते. हे पाणी मोठय़ा प्रमाणात गटारीत जाते. शिवाय काही वाहनचालक चारचाकी व दुचाकी धुण्यासाठी या पाण्याचा वापर करताना दिसतात. एकेकाळी पाणीटंचाई असणार्‍या अक्कलकोटमध्ये सध्या पाण्याचा सुकाळच आहे असेच म्हणावे लागेल.
सध्या वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आगामी काळात पावसाअभावी होणार्‍या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. अन्यथा पुन्हा पाणी टंचाईला शहरवासीयांना सामोरे जावे लागणार हे नक्की ! यासाठी नगरपालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांनी दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 
सध्या शहरात एकूण ४ हजार ८00 नळ कनेक्शन आहेत. संपूर्ण शहराला रोज ५२ लाख लिटर पाण्याची गरज आहे. अशा स्थितीत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हिळ्ळी, सांगवी, हालचिंचोळी या तीनही योजना सध्या पाण्याअभावी बंद आहेत. नुकतेच कार्यान्वित झालेल्या कुरनूर-अक्कलकोट या सुजल-निर्मल योजनेवर शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु ५ ते ६ तास भारनियमन होत असल्याने उर्वरित वेळेत ताशी दोन ते अडीच लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. या उपलब्ध होणार्‍या पाण्याचे वितरण शहरातील नळधारकांना पाच दिवसांतून एकदा असे तीन टप्प्यात होते.
काही भागात तीन दिवसाआड तर काही भागाला पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. तीन दिवसांनंतर जास्त दाबाने दोनच तास पाणी सोडल्यास शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल व ते वाया जाणार नाही. सध्या काही भागात ४ ते ५ तास तर काही भागात ७ ते ८ तास पाणीपुरवठा केल्याने पाणी वाया जाते आहे.
----------
पॅरा पाईपलाईन नसल्याने सोडलेले पाणी वाया जाते. नगरपरिषदेतर्फे नळांना तोटी बसविण्यात येणार आहे. त्यानंतर या तोटीकडे नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. - अभिजित ताम्हाणे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख
 
■ तत्कालीन नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा यांच्या कार्यकाळात तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून सुजल-निर्मल योजनेतून कुरनूर-अक्कलकोट अशी नवीन पाईपलाईन मंजूर केली होती. परंतु पालिकेतील भाजप-राष्ट्रवादी या सत्ताधार्‍यांनी याला विरोध केल्याने ही योजना रेंगाळली. विद्यमान नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांनी पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित केली.