शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 5:42 PM

मागणी करूनही आचारसंहितेच्या आधी सभा का बोलाविली नाही म्हणून सदस्यांनी आक्रमक पवित्रा.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता  लागू असल्याने मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरीइतिवृत्तास मंजुरी व आयत्यावेळच्या विषयात पाणीटंचाईचे विषय घेतले जाणार असल्याचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले

सोलापूर : मागणी करूनही आचारसंहितेच्या आधी सभा का बोलाविली नाही म्हणून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने शुक्रवारी दुपारी आयोजित केलेली झेडपीची सभा तहकूब करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली. 

झेडपीची सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता  लागू असल्याने मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी व आयत्यावेळच्या विषयात पाणीटंचाईचे विषय घेतले जाणार असल्याचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले. सभेच्या प्रारंभीच पक्षनेते आनंद तानवडे यांनी आजची सभा कशासाठी बोलाविण्यात आली आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यापाठोपाठ मदन दराडे, सचिन देशमुख, अरुण तोडकर, वसंत देशमुख उठले व त्यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला. 

सुभाष माने म्हणाले आचारसंहितेच्या आधी सभा का घेतली नाही. ३२ सदस्यांनी बजेट सभा घेण्याबाबत पत्र दिले होते. पण प्रशासनाने त्याला उत्तर दिले नाही. राज्यातील ३४ पैकी ३२ झेडपींनी बजेट मांडले. महापालिका, लोकसभा आणि विधानसभेचे बजेट झाले मग झेडपीचे बजेट का लांबविले. आता अधिकाºयांच्या हातात बजेट गेले आहे. तुम्ही आमची चेष्टा करता का. मग ही सभा कशासाठी बोलाविली, आम्हाला काम नाही म्हणून का. त्यावर उपाध्यक्ष पाटील यांनी यासाठी विशेष सभा बोलावू  असे सांगितले.  

पण तोवर सर्व सदस्य संतप्त झाले. सचिन देशमुख म्हणाले, आम्ही मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणार नाही, सभा तहकूब करा. त्यावर सर्वजण जागेवरून उठले व आम्ही सभात्याग करतो असा इशारा देत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. समयसूचकता दाखवित उपाध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे घोषित केले.

महिला सदस्यांची उपस्थितीआजच्या सभेला झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे हे उपस्थित नव्हते. तसे त्यांनी प्रशासनाला कळविले होते. तसेच चेन्नई येथील कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड गेले आहेत. बारामती येथील कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच सदस्य अनुपस्थित होते तर महिला सदस्यांची उपस्थिती मोठी होती. सदस्यांच्या गोंधळामुळे पाणी टंचाईचे विषय बाजूला राहिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकdroughtदुष्काळ