शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सोलापूर शहरात कुंभारीसह चिंचोली येथे होणार ‘मेगा क्लस्टर’, वस्त्रोद्योगासाठी जागा मिळाली, जिल्हाधिकाºयांकडे झाली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:30 PM

केंद्र शासनाने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या मेगा क्लस्टरसाठी चिंचोली (ता. उत्तर सोलापूर) किंवा कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागांचे पर्याय समोर आले आहेत. १५ दिवसांत या दोन्हीपैैकी एक जागा निश्चित करा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे अधिकारी आणि यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाºयांना दिलेजिल्हाधिकाºयांनी चार जागांचे पर्याय वस्त्रोद्योग संचालक आणि यंत्रमागधारक पदाधिकाºयांसमोर ठेवले होतेमेगा क्लस्टरसाठी दीड एमएलडी पाणी लागणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : केंद्र शासनाने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या मेगा क्लस्टरसाठी चिंचोली (ता. उत्तर सोलापूर) किंवा कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागांचे पर्याय समोर आले आहेत. १५ दिवसांत या दोन्हीपैैकी एक जागा निश्चित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे अधिकारी आणि यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाºयांना दिले. सहकारमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापुरात मेगा क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने जिल्हाधिकाºयांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. गेल्या दीड वर्षांपासून यासाठी बैठका सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पुन्हा बैठक झाली. वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाचे संचालक नरेशकुमार, सहायक संचालक एम.वाय.ए. शेख, सोलापुरातील वस्त्रोद्योग कार्यालयाचे विभागीय सहसंचालक के. जी. पवार, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंट्टप्पा गड्डम, सचिव राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम, गोविंद बुरा, अमर पाटील आदी उपस्थित होते. -------------------कुंभारी येथील जागा निश्चित होणार? च्मागील महिन्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी चार जागांचे पर्याय वस्त्रोद्योग संचालक आणि यंत्रमागधारक पदाधिकाºयांसमोर ठेवले होते. यातील दोन जागांचा विचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. कुंभारी येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे, परंतु तेथे पाणी उपलब्धतेची अडचण आहे. चिंचोली येथील जागेबाबत यंत्रमागधारक फारसे खुश नाहीत. त्यामुळे कुंभारी येथील जागेवर एकमत होईल, असे बुधवारी झालेल्या बैठकीतून निदर्शनास आले. मेगा क्लस्टरसाठी दीड एमएलडी पाणी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने कुंभारी परिसरात दीड एमएलडी पाणी उपलब्ध करू न देण्याबाबत सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे. शिवाय कुंभारी भागात कामगारांची उपलब्ध लवकर होईल, असाही विश्वास यंत्रमागधारक संघाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग