शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

टपरीमध्ये खेळला जाणारा मटका आता मोबाईलद्वारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:25 PM

सोलापूर शहरात लाखोंची उलाढाल : पोलिसांसमोर आव्हान; कारवाई कोणावर करायची?

ठळक मुद्देपोलीस खात्याला आव्हान देत मोबाईलवरून आॅनलाईन मटका जोरात सुरूदररोज लाखोंची उलाढाल होत असून, कोणावर अन् कशी कारवाई करायची हा सर्वात मोठा प्रश्न

संताजी शिंदे

सोलापूर : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसात शहरातील टपरीवर चालणारा मटका बंद झाला आहे; मात्र पोलीस खात्याला आव्हान देत मोबाईलवरून आॅनलाईन मटका जोरात सुरू आहे. दररोज लाखोंची उलाढाल होत असून, कोणावर अन् कशी कारवाई करायची हा सर्वात मोठा प्रश्न सध्या पोलीस खात्याला पडला आहे. 

सोलापुरात कल्याण, मुंबई हा मटका जोरात सुरू होता. शहरातील पान टपरी, चार चाकी हातगाड्यांवर मटका घेणारी मंडळी खुलेआम बोर्ड लावून बसलेली दिसत होती. शहरातील काही मंडळींनी आपली हद्द ठरवून घेऊन मटका घेत होती. आयुक्तांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांना दिले. अवैध धंद्यांमध्ये उघडपणे टपºयांमध्ये चालणारा मटका बंद झाला. हाच मटका आता टपरीतून मोबाईलमध्ये गेला आहे. मटका घेणारे एजंट हे घरात बसून किंवा अन्यत्र कोठेतरी थांबून व्यवसाय करीत आहेत. मटका खेळणारे खिलाडी बरोबर संबंधित व्यक्तीकडे जातात, आपला आकडा सांगतात अन् पैसे देतात.

मटका एजंट ही आपल्या नेहमीच्या ग्राहकाकडूनच मटक्याचा आकडा विचारतो अन् पैसे स्वीकारतो. पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला तरी संबंधित व्यक्तीकडे काही सापडत नाही. ओळखीचे ग्राहक  मोबाईलवरून संबंधितांना मटक्याचा आकडा सांगतो. मटका सुरू याची माहिती आहे, कोण चालवतो हे ही माहीत आहे; मात्र कारवाई कशी करणार.? कारण त्याच्याकडे पुरावे मिळत नाहीत असे पोलिसांकडून सांगितले जाते. 

मटका चालत असेल तर संपर्क साधा : डोंगरे- शहरात मोबाईलवरून आॅनलाईन मटका घेणाºयांविरुद्ध कारवाई केली आहे. मटक्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटकही केली आहे, मात्र असा प्रकार जर कोठे सुरू असेल तर नागरिकांनी न घाबरता पोलीस आयुक्तालयातील 0२१७-२७४४६२00, १00 किंवा माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक ७५0७१३३१00 संपर्क साधावा. माहिती सांगणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी केले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपचा असाही फायदा...- मटका घेतला जातो, तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संबंधित कंपनीला पोहोचवला जातो. मटका घेणाºया छोट्या एजंटाकडून संबंधित कंपनीचे लोक पैसे गोळा करतात. सध्या सुरत नाईट, अंधेरी नाईट, कल्याण या कंपनीचे मटके जोरात सुरू आहेत. वही, पेन अन् चिठ्ठीची जागा आता मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅपने घेतली आहे. 

ओपन क्लोजचा खेळ...- मटका खेळण्याचे तीन प्रकार आहेत, त्यात एक आकडी सुट्टा खेळायचा असेल तर १ रुपयाला ९ रुपये. दोन आकडी जॉर्इंट मटका खेळायचा असेल तर ९ रुपयाला ९0 रुपये अन् तीन आकडी पान्हा खेळायचा असेल तर मात्र १ रुपयाला १२५ रुपये दिले जातात. सकाळी ९ ते दुपारी २.३0 पर्यंत एक बाजार चालतो. दुपारी ३ नंतर मटक्याचा आकडा जाहीर होतो याला ओपन म्हणतात. दुपारी ३ नंतर चालणारा बाजार ५.३0 पर्यंत चालतो सायंकाळी ६ नंतर आकडा जाहीर होतो, याला क्लोज म्हणतात. बहुतांश ग्राहक शक्यतो सुट्टा किंवा जॉर्इंट खेळण्यावर भर देतात. मुरब्बी व्यापारी मात्र ‘पान्हा’ खेळून आपले नशीब अजमावत असतात.   

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी