"तू मला खूप आवडतेस"; विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोक्यात रॉड घातला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 23:22 IST2025-07-14T23:20:22+5:302025-07-14T23:22:32+5:30
सोलापुरात विवाहितेचा तिच्या पतीसमोरच विनयभंग करण्यात आला.

"तू मला खूप आवडतेस"; विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोक्यात रॉड घातला
Solapur Crime : तू मला खूप आवडतेस असे म्हणत जवळ ओढून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उमेश शिवाजी पवार आणि कुमार अशा दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ११ जुलै रोजी रात्री ११:३० च्या सुमारास घरासमोर फिर्यादी तिचा पती अंगणात झोपले होते. पीडितेच्या ओळखीचे आरोपी यांनी येऊन पीडितेस झोपेतून उठवून हात धरून तू मला खूप आवडतेस असे म्हणत जवळ ओढून मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. तू माझ्याबरोबर बाजूला चल म्हणत मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले. यावेळी पीडितेचे पती यांना आरोपी उमेश पवार यांनी पाठीमागून घट्ट मिठी मारून दुसरा आरोपी कुमार याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार काळे हे करीत आहेत.