शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

मराठी गझल समृद्ध होतेय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 2:11 PM

गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार.. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा ...

ठळक मुद्देआजमितीस मराठीत दोन-अडीचशे गझलकार तंत्रशुद्ध गझलरचना करताहेतगझलकारांना लिहिते करण्यासाठी गझल मुशायºयांबरोबरच गझल लेखन कार्यशाळा घेतल्या जाताहेतजणू मराठी गझलांना समृद्ध करण्याचा विडा यांनी उचललाय, असंच म्हणावं लागेल

गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार.. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा जरी मराठी गझलचा प्रवास झाला असला तरी आपला अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला आहे. कवी माधव ज्युलियन यांनी गझल सर्वप्रथम मराठीत आणली.

गझलांजली हा पहिला मराठी गझलसंग्रह प्रकाशित केला. त्यानंतर अनेक तत्कालीन व नंतरच्या अनेक कवींनी हा काव्यप्रकार हाताळला. कविवर्य सुरेश भटांनी गझल या काव्यप्रकाराला तंत्रशुद्ध अशी बाराखडीची जोड देऊन स्वत: अनेक उत्तमोत्तम गझलरचना तर केल्याच, पण इतर समकालीन कवींनाही गझल लेखनाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांची गझलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या व जुन्या गझलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे.

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषाविजा घेऊन येणाºया पिढ्यांशी बोलतो आम्हीअशा रचनांमधून त्यांनी मराठी गझलेच्या प्रश्नचिन्हावर भाष्य केलेय. एवढंच नव्हे तर गझल या काव्यप्रकाराला लोकमान्यतेबरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. आता खरोखरच गझलांच्या एकाहून एक जबरदस्त विजा घेऊन आलेल्या गझलकारांची एक मोठी फौज तयार झालीय. अनेक गझल मुशायरे, गझल संमेलने पादाक्रांत करताहेत. ही मराठी गझलेच्या दृष्टीनं सुखावह बाब आहे. पूर्वी गझलेमध्ये प्रेम या विषयाला प्राधान्य होतं, अन्य विषय क्वचितच गझलेच्या शेरात डोकावत असत. पण नंतरच्या काळात मराठी गझलेने आपला चेहरामोहराच बदलून टाकला.

शेतीप्रधान देशा दे एव्हढेच उत्तरकेव्हा बुडेल माझी डाळीत पूर्ण भाकरअशाप्रकारचा शेर जेव्हा सतीश दराडे लिहितो तेव्हा खरोखरच याचं प्रत्यंतर येतं.अनेक वैविध्यपूर्ण विषय आणि आशय मराठी गझलेमध्ये येताहेत. आता गझल विविध प्रवाहात लिहिली जातेय. एकप्रकारे गझलेच्या संक्रमणाचा काळच आता आला आहे, असं वाटतं. 

अनेक गझलकारांच्या गझला आता चित्रपटांमधून, मैफिलींमधून सादर होताहेत. नवनवीन शायर तर उदयास येताहेतच, त्याचबरोबर नव्या दमाचे गझल गायकही उदयास येताहेत. ही मराठी गझल रसिकांच्या दृष्टीने पर्वणीच होय. कशाला व्यथांची मिरवणूक नुसतीबघ्यांचीच होते करमणूक नुसतीया सुप्रिया जाधव यांच्या रचनेला आपल्या गझल गायकीने चार चाँद लावणारे राहुलदेव कदम असोत वाहासणे हे जरीही स्वभावात आहेजिंदगी भाकरीच्या दबावात आहेअशा किरणकुमार मढावी यांच्या अस्सल वैदर्भीय गझलेला स्वरबद्ध करून त्याला स्वर्गीय आवाजात सादर करणारे रूद्र कुमार असोत, मराठी गझलेला एका उंचीवर नेण्याचे काम ही सारी मंडळी करताहेत.

जळणाºयाला विस्तव कळतो, बघणाºयाला नाहीजगणाºयाला जीवन कळते, पळणाºयाला नाहीया नितीन देशमुखांच्या गझलेला तर गझलनवाज भीमराव पांचाळेदादांनी गाऊन त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन बसविले आहे.आजमितीला चंद्रशेखर सानेकर, जयदीप जोशी, गणेश नागवडे, संतोष वाटपाडे, गोविंद नाईक, शुभानन चिंचकर, वैवकु, सतीश दराडे, इंद्रजित उगले, सचिन क्षीरसागर या पुरुष गझलकारांबरोबरच शिल्पा देशपांडे, रत्नमाला शिंदे, ममता सिंधुताई, सुप्रिया जाधव अशा स्त्री गझलकारांनी आपापली वेगळी शैली निर्माण करून मराठी गझल अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण व लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. इतरही अनेक नवे-जुने गझलकार आपापल्या परीने मराठी गझलेचा परीघ विस्तारण्याचे काम करीत आहेत. त्या सर्वांचा नामोल्लेख करणे अशक्य आहे.

आजमितीस मराठीत दोन-अडीचशे गझलकार तंत्रशुद्ध गझलरचना करताहेत, ही खूपच समाधानाची बाब आहे. गझलरंग, ब्रह्मकमळ, करम, गझलसागर प्रतिष्ठान, ध्यास गझल, गझल तुझी माझी, ध्येयाचा प्रवास, अशा विविध गझल मुशायºयांचे आयोजन करणाºया मंडळींनी गझलकारांना व्यासपीठ मिळवून दिलेय. अनेक नवीन गझलकारांना लिहिते करण्यासाठी गझल मुशायºयांबरोबरच गझल लेखन कार्यशाळा घेतल्या जाताहेत. जणू मराठी गझलांना समृद्ध करण्याचा विडा यांनी उचललाय, असंच म्हणावं लागेल. - कालिदास चवडेकर(लेखक हे गझलकार आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरmusicसंगीतmarathiमराठी