Maratha Reservation: पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांचे अर्धनग्न होऊन आंदोलन, राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन

By appasaheb.patil | Published: May 5, 2021 12:25 PM2021-05-05T12:25:26+5:302021-05-05T12:26:09+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Maratha Reservation: Youths of Maratha community in Pandharpur go half-naked in protest | Maratha Reservation: पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांचे अर्धनग्न होऊन आंदोलन, राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन

Maratha Reservation: पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांचे अर्धनग्न होऊन आंदोलन, राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन

Next

सोलापूर - मराठा समाजास आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं आज मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षण कायदा रद्द केलं आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही बांधवांनी अर्धनग्न होऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करीत सामुहिक मुंडण आंदोलन केलं

 राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. सरकार आरक्षणाच्यावतीने बाजू कमी पडल्याचा आरोप पंढरपुरातील समाज बांधवांनी केला आहे. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही मंत्री, आमदार, खासदार यांच्या गाड्या फोडू, असा इशारा दिला, आमच्या५६मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, अनेक युवक तुरुंगात आहेत,आणि सरकार गप्प आहे,हा आमच्यावर मोठा अन्याय असून आम्ही याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे  मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, स्वागत कदम, शशिकांत शिंदे, धनंजय मोरे, संतोष कवडे तसेच इतर मराठा समाजबांधव उपस्थित होते, अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Web Title: Maratha Reservation: Youths of Maratha community in Pandharpur go half-naked in protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.