शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

ऐन पावसाळ्यात सोलापूर शहरातील अनेक डीपी बॉक्स सताड उघडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 14:56 IST

महावितरणचे दुर्लक्ष; शॉर्टसर्किटचा धोका वाढला अनेक ठिकाणी स्पार्किंगने लागतेय आग

ठळक मुद्देहोटगी रोड औद्योगिक वसाहतीमध्ये एका घराजवळ उघडा डीपी बॉक्सपावसाळ्याच्या काळात वाºयाच्या हेलकाव्याने प्रवेशद्वारात विजेचा प्रवाह उतरू शकतोशॉर्टसर्किट होऊन एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली होती

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : सध्या वादळी वारे आणि पावसाचा मोसम असताना शहरातील अनेक डीपी बॉक्स सताड उघडे असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शॉर्टसर्किटचा धोका वाढला असून, तेथे स्पार्किंग होत असल्याचेही दिसून आले आहे.

 पावसाळ्यामध्ये या डीपीतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्त्वाच्या बाबींकडे महावितरण आणि पालिकेने दुर्लक्ष केले आहे.  डीपींची दुरुस्ती आणि विजेशी संबंधित नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे असताना डीपी बॉक्सची दारं आणि त्याच्या कड्या दुरूस्त करण्यात आल्या नाहीत, हेही पाहण्यात आले. 

एमआयडीसी परिसरातील रोहित्रांचे दरवाजे तुटलेले आणि उघडे आढळले. या रोहित्रांमध्ये मोठा विद्युत प्रवाह असल्याने एखादी व्यक्ती या प्रवाहाच्या संपर्कात असल्यास त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता आहे. 

तसेच या रोहित्रामध्ये पाणी गेल्यास शॉर्टसर्किट होण्याची देखील शक्यता आहे. डीपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्यामुळे बॉक्समधील तारा दिसत आहेत.

होटगी रस्त्यावरील मजरेवाडीकडे जाणाºया रस्त्यावरही असाच उघडा डीपी बॉक्स दिसून आला. येथे रस्त्यावरील भागात पाणी साचून वीजप्रवाह या पाण्यात उतरण्याची शक्यता आहे. 

या रस्त्यांवरून कायमच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. तर काही वेळेस जास्त दाबाने वीजप्रवाह असल्यास डीपीजवळच्या वीजवाहक तारांत स्पार्किंग होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.  या मार्गावरील चेतन फौंड्रीजवळ डीपी बॉक्सही उघडाच आहे. हा शहरातील व्हीआपी मार्ग असताना या उघड्या डीपीकडे मात्र वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. याकडे कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

घराच्या शेजारीच उघडे डीपी बॉक्स होटगी रोड औद्योगिक वसाहतीमध्ये एका घराजवळ उघडा डीपी बॉक्स आहे. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. पावसाळ्याच्या काळात वाºयाच्या हेलकाव्याने प्रवेशद्वारात विजेचा प्रवाह उतरू शकतो. येथे शॉर्टसर्किट होऊन एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली होती. तरीही हा डीपी उघडा आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरातील बºयाच डीपी या उघड्या आहेत, त्यांचे बॉक्स हे खराब झाले आहेतक़ाहींना दरवाजे नाहीत़ या समस्येवर विभागीय कार्यालयाने ५० लाखांच्या पुढे टेंडर काढले आहे़ ते मंजूरही झाले आणि लॉकडाऊनमुळे काम रखडले़ लवकरात लवकर डीपी बसवले जातील. - प्रसन्न कुलकर्णी शहर अभियंता, महापारेषण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊस