याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रमिला काळे या हातगाडीवर खारी व टोस्ट विक्रीचा व्यवसाय करतात. त्या बुधवारी सायंकाळी आपला व्यवसाय करत असताना आरोपी जाधवने फिर्यादी प्रमिला यांना राजू राठोड कुठे आहे?, असे विचारले, त्यावेळी त्यांनी माहीत नाही, असे सांगितले. अर्जुनने त्यांच्या गालावर चापट मारून शिवीगाळ केली व चाकूचा धाक दाखवून प्रमिला यांच्या गळ्यातील चार हजार रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}