झोपलेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र पळविले, तेव्हा आले लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 10:23 IST2022-02-14T10:22:17+5:302022-02-14T10:23:04+5:30

सांगोला : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार किमतीचे सव्वातोळे सोन्याचे मंगळसूत्र काढून ...

Mangalsutra snatched from the neck of the sleeping woman in sangola | झोपलेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र पळविले, तेव्हा आले लक्षात

झोपलेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र पळविले, तेव्हा आले लक्षात

सांगोला : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार किमतीचे सव्वातोळे सोन्याचे मंगळसूत्र काढून चोरट्यांनी लंपास केले. गुरुवारी मध्यरात्री सांगोला तालुक्यात जवळा येथे ही घटना घडली. याबाबत मायाक्का सिदा गावडे (रा.जवळा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सिदा गावडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. ही संधी साधून घरात झोपलेल्या मायाक्का गावडे यांच्या गळ्यातील सव्वातोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी काढून पोबारा केला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या झिंगूबाई जगन्नाथ शेंडगे यांनी झोपेतून उठून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून कडी लावल्यामुळे उघडला नाही. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारे गोकुळ गावडे व ज्ञानू गावडे यांनी दरवाजाची कडी काढली. त्यावेळी सिदा गावडे यांच्या कुटुंबातील सर्व जागे झाले अन् झोपेतून उठलेल्या मायाक्का गावडे यांना गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले

Web Title: Mangalsutra snatched from the neck of the sleeping woman in sangola