Sikandar Shaikh: 'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:38 PM2023-01-24T23:38:13+5:302023-01-24T23:43:38+5:30

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मिश्कील प्रतिक्रिया दिली

Maharashtra Kesari Even though I lost the wrestling match, I was the 'Maharashtra Kesari' in the minds of the people, Sikandar Shaikh in solapur | Sikandar Shaikh: 'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी'

Sikandar Shaikh: 'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी'

Next

सोलापूर - पुणे येथे यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पै. सिकंदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. या मॅचमध्ये गुणांवरुन वाद सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पै. सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे, सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर सिंकदर शेख ट्रेंड करत होता. सिंकदरनेच हा डाव जिंकल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मात्र, पंचाच्या निर्णयामुळे तो महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर पडला. आज, पुन्हा एकदा सिंकदरला पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न केला. त्यावर, मी जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी असल्याचं सिकंदरने म्हटले.  

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मिश्कील प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कुणी कुणाला मारली यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये कधी कुणी अंगाला माती न लावलेले, कधीही न शड्डू ठाकलेले आघाडीवर होते. माझ मत आहे जे यात खेळ खेळतात, त्यांनीच यात बोलावे. आमच्या सारख्यांनी यात तोंडाची वाफ वाया घालवू नये, असे अजित पवारांनी म्हटले. दरम्यान, हा वाद आता शांत झाला असतानाच, मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सिकंदरने म्हटलं आहे.  

महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत मी हरलो असलो तरी, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. स्पर्धेत हरलो असलो तरी जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी मी आहे, असे पै. सिकंदर शेख याने म्हटले आहे. पंढरपूर येथील भीमा केसरी कुस्ती मैदानात मल्ल बनून सिकंदर शेख फडात उतरला होता. खूप दिवसांनी आपल्याच तालुक्यात खेळतोय, याचा मला अधिक आनंद आहे, असेही सिकंदर शेखने माध्यमांशी बोलताना म्हटले.  

कुस्तीबद्दल पै. सिकंदरचे काय होते म्हणणे

सिकंदर शेखने म्हटले, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."

Web Title: Maharashtra Kesari Even though I lost the wrestling match, I was the 'Maharashtra Kesari' in the minds of the people, Sikandar Shaikh in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.