शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

महाराष्ट्रानं कौल दिलाय ना; भांडताय कशाला? लवकरात लवकर सत्ता स्थापन करा !

By appasaheb.patil | Published: November 04, 2019 3:52 PM

सोलापूरकरांनी व्यक्त केल्या भावना : दोन्ही पक्षांनी नमते धोरण स्वीकारून जनतेच्या कल्याणाचा विचार करावा, विकास करण्याचेही आवाहन

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक पक्षांतरामुळे गाजली. या पक्षातील नेते त्या पक्षात जाऊन निवडणूक लढलेया निवडणुकीत भाजप - सेनेने अन्य पक्षांना घेऊन महायुती केली अन् निवडणूक जिंकली.महायुतीनं संख्याबळाची मॅजिक फिगर गाठली असताना. सरकार लगेचच स्थापन व्हायला हवे

सोलापूर : विधानसभानिवडणूक पक्षांतरामुळे गाजली. या पक्षातील नेते त्या पक्षात जाऊन निवडणूक लढले. कोण जिंकले; तर कोण पराभूत झाले. या निवडणुकीत भाजप - सेनेने अन्य पक्षांना घेऊन महायुती केली अन् निवडणूक जिंकली. महाराष्टÑातील जनतेने या महायुतीलाच कौल दिला. महायुतीनं संख्याबळाची मॅजिक फिगर गाठली असताना. सरकार लगेचच स्थापन व्हायला हवे; पण आता भाजप अन् सेना मुख्यमंत्रीपदासाठी भांडत बसले आहेत. ही बाब अतिशय निराशाजनक आहे. जनतेने जर तुम्हा दोघांना सरकार स्थापन करण्याचा कौल दिला तर तुम्ही तसे केले पाहिजे; पण आता एकमेकांशी आणि जनतेशी प्रतारणा करण्याची भाषा केली जात आहे. हे सोडून आता सत्ता स्थापन केली पाहिजे अन् जनतेच्या कल्याणाचा विचार करून विकासासाठी झपाटून काम केले पाहिजे, असे आवाहन सर्वसामान्य सोलापूरकरांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्टÑाच्या राजकारणात मित्र पक्ष असलेल्या भाजप - सेनेने एकमेकांवर कुरघोडी करण्याची व्यूहरचना रचली आहे. या पार्श्वभूमीवर  ‘लोकमत’ चमूने सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, महिला अन् विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी प्रत्येकानेच उपरोक्त भावना व्यक्त केल्या.

सत्ता मिळाल्यानंतर भाजप-शिवसेना हे वाद करीत आहेत.आताच वाद करीत असून पुढील पाच वर्षे हे काय राज्याचा विकास करणाऱ शेतकºयांच्या नुकसानीकडे कोणाचेच लक्ष नाही़ भाजप-सेनेने संघर्ष लवकरात लवकर संपवून सत्ता स्थापन करावी एवढीच इच्छा़ - तेजस्वी गणपत जेटीथोरविद्यार्थिनी, दयानंद महाविद्यालय, सोलापूर

भाजप-सेनेचे जे वाद सुरू आहेत़ त्यात कोणाकोणाला जबाबदार आपण ठरविणार आहोत़ सर्वांनाच वाटते की आपली सत्ता असावी़ सत्ता कोणाचीही असो मात्र विकास झाला पाहिजे़ आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे़ सत्ता कोणाची येणार याबाबत आजही तर्कवितर्क लढविले जात आहेत़ लोकांचा विकास हाच अजेंडा असावा असे मला वाटते़- मुबासिन पटेल,विद्यार्थिनी, दयानंद महाविद्यालय, सोलापूर

भाजप-शिवसेनेने कोणत्याही अटींवर विचार न करता पहिल्यांदा सत्ता स्थापन करावी़ भाजप जर शिवसेनेसोबत युती करू शकत नसेल तर काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी़ निवडणुकीपूर्वी युती होती त्याच पद्धतीने निवडणुकीनंतरही दोघांनी एकत्रच रहावे़ शेवटी राज्याचा विकास होणे अपेक्षित आहे़- आशिष संगवे,विद्यार्थी, वालचंद महाविद्यालय, सोलापूर

भाजप-सेनेचे सरकार स्थापन व्हावे़ महाराष्ट्राच्या जनतेने चांगला कौल दिला आहे़ भाजपने मोठेपणा दाखवावा़ सत्ता स्थापनेसाठी होत असलेल्या वादामुळे भाजपावर लोकांचा विश्वास कमी होत आहे़ भाजपने दोन पाऊले मागे घेत शिवसेनेला ज्यादा मंत्रीपद देऊन त्वरित सत्ता स्थापन करावी़ मोदींसोबत बैठकीत जे ठरले आहे त्याच पद्धतीने फिप्टी-फिप्टी फॉर्म्युला सत्ता स्थापनेत वापरावा हीच अपेक्षा़ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत. - अश्विन डोईजोडे,व्यापारी, सोलापूर

लोकांच्या कल्याणासाठी सरकार स्थापन करायला हवं़ मागील पाच वर्षे भाजपने सत्ता उपभोगली ना आता शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठबळ द्यावे़ निवडणुकीपूर्वी जे जे ठरले होते त्या त्या पद्धतीने सर्व काही व्हायला हवं़ उगाच लोकांना गोंधळात टाकण्यासाठी भाजप-सेनेने असा गोंधळ घालू नये़ सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य नाही़ भाजप व सेनेनेच सत्ता स्थापन करावी़- श्रीधर गिराम, व्यापारी, सोलापूर

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीला युतीबरोबर घेऊ नये़ भाजपने एक पाऊल मागे घेऊन शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे़ भाजप व सेनेने आतापर्यंत हिंदुत्ववादी म्हणून निवडणुका लढविल्या आहेत़ आता सत्ता स्थापनेसाठी दोघांनी एकमेकांविरुद्ध टोकाची भूमिका घेणे चुकीचे आहे़  किती दिवस जनतेला वेठीस धरणार आहोत आपण़  राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेत लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी़ हा वाढत जात असलेला वाद मिटवावा हीच अपेक्षा़- सुनील धरणे, व्यापारी, सोलापूर

भाजपने सेनेला संधी दिली पाहिजे़ सत्ता स्थापनेसाठी उगाच वाद वाढविणे चुकीचे आहे़ दोघांच्या जागा कमी जास्त जरी आल्या तरी निवडणुकीपूर्वी दोघांनी युती करून निवडणूक लढविली आता जागेवरून वाद करायला नको़ भाजपने शिवसेनेची भूमिका लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी एक संधी द्यावी़ राज्यातील शेतकºयांच्या प्रश्नासोबतच राज्यात वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवं.- आकाश साबा, विद्यार्थी, सोलापूर

लोकांनी कौल दिला आहे़ लोकांचा गैरफायदा भाजप-सेना घेत आहे़ पाच वर्षे भाजपला सत्ता दिली. पाच वर्षे तुम्ही काय केलं़ जर युती करीत नसाल तर बाजूला व्हायला हवं़ युती करण्यापूर्वीच तुम्ही सर्व काही ठरवायला पाहिजे होतं़ आता त्या पदासाठी भांडण करणे योग्य नाही़ जर तुम्हाला सत्ता स्थापन करणे होत नसेल तर सेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी़ पाच वर्षे भाजपला सत्ता दिली, त्यांनी सत्ता उपभोगली आता शिवसेनेला सत्तेत घेऊन त्यांना सत्ता उपभोगू द्या म्हणजे झालं़ - सुरेश रेळेकर, व्यापारी.

भाजप-सेनेचा जो वाद सुरू आहे तो योग्य नाही़ लोकसभेला आलेले अमित शहा आता कुठं आहेत़ सेनेनं राष्ट्रवादीसोबत जाऊ नये़ युती करून सत्ता स्थापन करण्यासाठीचं जे संख्याबळ आपल्याकडे आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन सत्ता स्थापन करावी़ राज्यातील जनतेचा विचार करून भाजपनं लवकर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा़- पांडुरंग नरोटे, व्यापारी.

मराठी अस्मितेसाठी राष्ट्रवादी व सेनेने एकत्र यावे़ भाजपला सत्तेबाहेर ठेवावे़ रोजगारांचा प्रश्न राज्यात गंभीर आहे़ रोजगारांसह शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सेनेने सत्तेत येणे योग्य आहे़ शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा़ भाजप-सेनेनं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भांडण्यापेक्षा राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भांडावे़ जर भाजप सोबत घेत नसेल तर सेनेनं राष्ट्रवादीची हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी़ आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील़ एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे़ - मल्लिकार्जुन येवले, नागरिक

भाजप-सेनेनं गोंधळ न करता महायुतीचे सरकार स्थापन करावे़ सध्या जो गोंधळ सुरू आहे तो दोन दिवसापुरताच असेल त्यानंतर तो संपला जाईल़ शेवटी महायुतीचेच सरकार येईल व देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील यात मात्र शंका नाही़ सेनेनं राष्ट्रवादीसोबत जाऊ नये़ महायुती करून आपल्याला जनतेने कौल दिला आहे त्याचा अपमान करू नये़ लवकरच सत्ता स्थापन होईल यात मात्र शंका नाही़ - प्रकाश पाटील, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण