शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

15 लाख रुपये घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पिशव्या घेऊन माधव भंडारी यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:30 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपुरात अनोखे आंदोलन

ठळक मुद्देमाधव भंडारी आज पंढरपूर दौऱ्यावरराष्ट्रवादीने दिल्या भाजप विरोधात घोषणा

पंधरा लाख घेण्यासाठी कार्यकर्ते पिशवी घेऊन माधव भंडारीकडेपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. चार वर्षे उलटून गेली तरी अजून पंधरा रुपये देखील जनतेच्या खात्यात जमा झालेले नाहीत. असे सांगत पिशव्या सोबत घेऊन आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्याकडे 15 लाख रुपये देण्याची मागणी करत अनोखे आंदोलन केले.

भंडारी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दुपारी पंढरपुरात दाखल झाले. कार्यक्रमापूर्वी शासकीय विश्रामगृहात ते आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह चर्चा करत बसले होते.

त्यावेळी तिथे अचानकपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, शरद प्रतिष्ठानचे श्रीकांत शिंदे, सुरज पेंडोर, सुमित गायकवाड, विजय मोरे, प्रवीण यादव, आनंद कथले आदी कार्यकर्ते आले.

हे सर्व कार्यकर्ते स्वतःच्या हातामध्ये पिशव्या सोबत घेऊन आले होते नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले 15 लाख रुपये अजून आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत हे पैसे नेण्यासाठी आम्ही आत्ता सोबत पिशव्या घेऊन आलो आहोत असे म्हणून पिशव्या दाखवून आश्वासनाप्रमाणे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा अचानक झालेल्या अशा आणि च्या अनोख्या आंदोलनामुळे मंडळीदेखील काही क्षण अवाक झाले. त्यांनी आपल्याकडे देण्यासाठी पंधरा रुपये देखील नाहीत मी खासगी कामानिमित्ताने आलो आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तिथे उपस्थित असलेल्या आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले त्यानंतर हे अनोखे आंदोलन संपले.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस