सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात ‘लोकमत’चे योगदान : प्रभाकर कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:46 IST2019-01-22T15:43:39+5:302019-01-22T15:46:34+5:30
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी ‘लोकमत’चे खूप मोठे योगदान असल्याचे मत केएलई सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार प्रभाकर ...

सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात ‘लोकमत’चे योगदान : प्रभाकर कोरे
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी ‘लोकमत’चे खूप मोठे योगदान असल्याचे मत केएलई सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.
कोरे हे सोमवारी सोलापुरात आले असता त्यांनी सायंकाळी होटगी रोडवरील ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी केएलई सोसायटीच्या शैक्षणिक संस्थांवर प्रकाश टाकताना सोलापुरातील अनेक शैक्षणिक प्रकल्प, उपक्रम राबविणार असल्याचेही सांगितले.
सध्या केएलईच्या राज्यातच नव्हे संपूर्ण देशात २३५ पेक्षा अधिक शाखा आहेत़ शैक्षणिक, मेडिकल, लॉ आदी क्षेत्रात केएलईच्या शैक्षणिक दर्जेचा दबदबा आहे़ सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या रूग्णालयास मोठया प्रमाणात गर्दी होत आहे़ बीपीएल धारकांना मोफत आरोग्यसुविधा देण्यात येतात असेही कोरे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘लोकमत’ च्या विविध उपक्रमाबाबत कौतुक करीत प्रभाकर कोरे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक बागेवाडी, महांतेश कवटगीमठ, अमित कोरे, श्रीशैलप्पा मेटगुड, जयानंद मुनावल्ली, शंकरण्णा मुनावली, बसवराज पाटील, विश्वनाथ पाटील, अनिल पट्टेद, डॉ. विरुपाक्ष सुधानवर आदी उपस्थित होते.